Road Safety World Series | वीरेंद्र सेहवागचा झंझावात, 28 चौकार आणि 7 षटकारांसह 139 चेंडूत चोपल्या 214 धावा

| Updated on: Mar 22, 2021 | 10:51 AM

वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2020-21 स्पर्धेत एकूण (Road Safety World Series 2020 21) 214 धावा केल्या.

Road Safety World Series | वीरेंद्र सेहवागचा झंझावात, 28 चौकार आणि 7 षटकारांसह 139 चेंडूत चोपल्या 214 धावा
वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2020-21 स्पर्धेत एकूण (Road Safety World Series 2020 21) 214 धावा केल्या.
Follow us on

रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी 20 स्पर्धेतीत (Road Safety World Series) अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्सने श्रीलंका लेजेंड्सचा 14 धावांनी धुव्वा उडवला. यासह इंडियाने विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेदरम्यान अनेक फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यापैकी एक म्हणजे (Virender Sehwag) वीरेंद्र सेहवाग. सेहवागने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या नेहमीच्या पद्धतीने फटकेबाजी केली.त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. (India Legends virender sehwag performence in Road Safety World Series 2020 21)

सेहवागची स्पर्धेतील कामगिरी

सेहवागने या स्पर्धेतील एकूण 7 सामन्यांमध्ये 160 च्या स्ट्राईक रेटने आणि 42.80 सरासरीने 139 चेंडूत 2 अर्धशतकांसह 214 धावा केल्या. 80 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरला. तर सेहवाग 2 वेळा नाबाद परतला. तसेच यामध्ये सेहवागने 28 चौकार आणि 7 षटकार फटकावले.

सेहवागची सामनानिहाय कामगिरी

1. सेहवागने 7 मार्चला वेस्टइंडिज लेजेंड्स विरुद्ध 57 चेंडूमध्ये 11 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या होत्या. हा सामना मुंबईत खेळवण्यात आला होता.

2. इंडिया लेजेंड्सने या स्पर्धेतील दुसरा सामना 10 मार्चला श्रीलंका लेजेंड्स विरुद्ध खेळला. यात सेहवागने 5 चेंडूत 3 धाना केल्या.

3. बांगलादेश लेजेंड्स विरुद्ध 5 मार्चला सामना खेळण्यात आला. या सामन्यात सेहवागने 35 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 80 धावा चोपल्या.

4. सेहवागने 9 मार्चला इंग्लंड लेजेंड्स विरुद्ध 5 चेंडूत 1 चौकारासह 6 धावा केल्या.

5. दक्षिण आफ्रिका लेजेंड्स विरुद्ध 13 मार्चला झालेल्या सामन्यात सेहवागने 8 बोलमध्ये 1 फोरसह 6 रन्स केल्या.

6. वेस्टइंडिज लेजेंड्स विरुद्ध 17 मार्चला सेमी फायनल सामना पार पडला. या निर्णायक सामन्यात सेहवागने धमाका केला. सेहवागने 17 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 35 धावा कुटल्या.

7. श्रीलंका लेजेंड्स विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सेहवागने निराशआ केली. सेहवागने या सामन्यात 10 चेंडूंमध्ये 1 सिक्ससह 10 धावा केल्या.

स्पर्धेत सर्वाधिक धावा कुणाच्या ?

दरम्यान या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी इंडिया लेजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने केली. सचिनने 7 सामन्यांमध्ये 38.83 च्या सरासरीने आणि 138.69 च्या स्‍ट्राइक रेटने 233 धावा केल्या. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश होता.

संबंधित बातम्या :

Video : मैदानात सचिन-युवीचं वादळ, चौकार षटकारांची बरसात, इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिजला लोळवलं!

Video: सेहगाव सचिन जोडी पुन्हा मैदानात, वीरुनं पुन्हा ठोकलं, सिक्स मारुन फिफ्टी, पाहा तो व्हिडीओ

(India Legends virender sehwag performence in Road Safety World Series 2020 21)