मुंबई : सध्या आशिया चषकातील (Asia Cup 2022) महत्त्वाचे सामने सुरु झाले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान आणि भारतीय संघातील (Indian Team) खेळाडू जखमी झाले आहेत. भारतीय संघातील फिरकीपट्टू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याच्या जाग्यावर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा महत्त्वाचा सामना होणार आहे. पाकिस्तानच्या एका महत्त्वाचा जलदगती गोलंदाजाला आशिया चषकातून बाहेर पडावं लागलं आहे. शाहनवाज दहानी रविवारी होणाऱ्या सामन्याविरोधात खेळणार नसल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केली आहे. पण पाकिस्तानी मीडियाने तो आशिया चषकातून बाहेर पडल्याची बातमी दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान शाहनवाज दहानी गोलंदाज जखमी झाला आहे. त्यामुळे तो पुढच्या दौऱ्यात पाकिस्तान संघात नसणार आहे. त्याने आत्तापर्यंत आशिया चषकात चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी शाहनवाज दहानी याने हॉगकॉंग विरुद्ध गोलंदाजी केली त्यावेळी त्यांचं दुखण अधिक असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे त्याला पुढच्या काही तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला पुर्णपणे फिट असल्याचे सांगितले तर तो पुढचे सामने खेळेल.
पाकिस्तानचे स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर दुखापतीमुळे पाकिस्तानला स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. तसेच भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हारिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान गोलंदाजांना स्नायूंच्या ताणाचा सामना करावा लागला. हाँगकाँगविरुद्ध डहाणीने 1 बळी घेतला, मात्र भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला कोणतेही यश मिळाले नाही. त्यालाही दुखापत झाल्याने पुढचे सामने पाकिस्थानला अधिक संघर्ष करावा लागणार आहे.