अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (India vs England 3rd Test) 24 फेब्रुवारीपासून (उद्या) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना डे-नाईट असणार आहे. ही मॅच गुलाबी चेंडूने खळण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात दुसऱ्या कसोटी सामना झाल्यानंतर बीसीसीआयने मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. एकूण 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवचे संघात पुनरागमन झालं आहे. (India Predicted XI for 3rd Test: Pink ball might force Kohli to make two changes)
दरम्यान, या सामन्यात भारताचा अंतिम 11 जणांचा संघ कसा असेल? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. चेन्नई कसोटी जिंकवणारा भारताचा संघ संतुलित वाटत असला तरी तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि संघाचे प्रशिक्षक संघात काही बदल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आलेला भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याद्वारे कमबॅक करेल, असं बोललं जात आहे. त्यासाठी मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. इशांत शर्मा या सामन्यातही खेळणार आहे हे निश्चित आहे.
मोटेराची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने भारतीय संघ या सामन्यात दोन किंवा तीन फिरकीपटूंना संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या कसोटीत रवीचंद्रन अश्विनने पहिल्या डावात पाच गडी बाद केले होते, तर अक्षर पटेलने दुसऱ्या डावात 5 विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात हे दोघेही संघात दिसतील. तर कुलदीप यादवलादेखील अजून एक संधी मिळू शकते. तसेच त्याला या सामन्यात विश्रांतीदेखील दिली जाण्याची शक्यता आहे.
भारताची फलंदाजी भक्कम आहे. त्यामुळे त्यात सध्यातरी कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. तर अनेकांना असं वाटतं, की तिसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक फलंदाज हार्दिक पंड्याला संधी दिली जाऊ शकते. कुलदीप यादवऐवजी हार्दिंक पंड्याला या सामन्यात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जर तसे झाल्यास हार्दिक पांड्याला गोलंदाजीदेखील करावी लागले. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्याने गेल्या काही महिन्यात खूपच कमी सामन्यात गोलंदाजी केली आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
नेट गोलंदाज | संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, सौरभ कुमार, अंकित राजपूत आणि आवेश खान.
रिझर्व्ह प्लेअर्स | केएस भरत आणि राहुल चाहर.
इतर बातम्या
7 वर्षांनी मैदानात उतरलेल्या श्रीशांतचा धमाका, विजय हजारे ट्रॉफीत एकट्याने निम्मा संघ माघारी धाडला
कृणाल पंड्याचा झंझावात, पाचव्या नंबरवर येऊन वादळी शतक, बाजी पलटली!
ब्रेट ली- शोएब अख्तरला टक्कर, सचिनसोबत स्लेजिंग, मग युवराजने करिअरच संपवलं!
(India Predicted XI for 3rd Test: Pink ball might force Kohli to make two changes)