सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India Tour Australia) दौऱ्यासाठी सिडनीत पोहचली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतरच्या पुढील 14 दिवस क्वारंटाईन राहणार आहे. दरम्यान टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची आणि सहकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर सर्व खेळाडू आणि सहकाऱ्यांचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह आला. यानंतर टीम इंडियाने नेट्समध्ये सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. या 3 एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. india tour australia team india corona report negative players practice hard in nets
Two days off the plane and #TeamIndia had their first outdoor session today. A bit of ? to get the body moving! #AUSIND pic.twitter.com/GQkvCU6m15
— BCCI (@BCCI) November 14, 2020
टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी नेट्स प्रॅक्टीसमध्ये सहभाग घेतला. बीसीसाआयने टीम इंडियाच्या सरावादरम्यानचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि मोहम्मद सिराजने भाग घेतला. तसेच फिरकीपटू कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज उमेश यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर आणि चेतेश्वर पुजारानेही नेट्समध्ये कसून सराव केला. तसेच इतर खेळाडूंनी जीममध्ये घाम गाळला.
Two days off the plane and #TeamIndia had their first outdoor session today. A bit of ? to get the body moving! #AUSIND pic.twitter.com/GQkvCU6m15
— BCCI (@BCCI) November 14, 2020
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निमित्ताने कुलचा जोडीची भेट झाली. कुलचा म्हणजे फिरकीपटू कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल. या फिरकीपटू जोडीला लाडाने कुलचा म्हटलं जातं. चहलने कुलदीपसोबतचा फोटो शेअर केला आहे. “माझा भाऊ कुलदीपसोबत भारतीय संघात पुनरागमन”, असं कॅप्शन चहलकडून या फोटोला देण्यात आलं आहे.
Back with my brother @imkuldeep18 and back on national duty for ??#TeamIndia ? #spintwins #kulcha pic.twitter.com/NmWmccaEXt
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) November 14, 2020
टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये प्रत्येकी 3 एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळणार आहे. यानंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. सुधारित संघामध्ये हिटमॅन रोहित शर्माची केवळ कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी थंगारासू नटराजनला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. जानेवारी महिन्यात विराटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे या अशा वेळेस विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. बीसीसीआयने त्याला पाल्कत्वाची रजा मंजूर केली आहे.
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा
india tour australia team india corona report negative players practice hard in nets