इंग्लंडला टेकऑफ करण्यापूर्वी टीम इंडिया मुंबईत, PPE घातलेला विराटचा हुकमी एक्का कोण? ओळखा…!
भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौर्यावर रवाना होतील. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत सर्व खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी मुंबईत क्वारंटाईन रहावे लागणार आहे. यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू मुंबईत येत आहेत. (India tour Of England 2021 Players Arrives in Mumbai)
1 / 5
भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौर्यावर रवाना होतील. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत सर्व खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी मुंबईत क्वारंटाईन रहावे लागणार आहे. यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू मुंबईत येत आहेत.
2 / 5
बीसीसीआयने टीम इंडियाच्या काही खेळाडूंचे विमानातले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, मिताली राज आणि मोहम्मद सिराज दिसत आहेत. फोटोत सिराजने पीपीई किट परिधान केलंय, ज्यामध्ये त्याला ओळखणे कठीण जात आहे.
3 / 5
भारतीय पुरुष संघ 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळेल. यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडबरोबर कसोटी सामन्यांची मालिका खेळेन. महिला संघाला इंग्लंडविरुद्ध 1 कसोटी सामन्यासह एकूण 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.
4 / 5
लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल बंगळुरुवरुन बाय रोड चेन्नईला पोहोचले. तिथून रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी टेकऑफ घेतलं. चार्टर्ड विमानाने मोहम्मद सिराज चेन्नईला पोहोचला.
5 / 5
दिल्लीहून खेळाडूंना घेऊन तीन चार्टर्ड विमाने मुंबईत येणार आहेत. त्यापैकी रिषभ पंत, शुभमन गिल, उमेश यादव, आवेश खान, अभिमन्यू ईश्वरन, इशांत शर्मा या विमानात येतील. कोलकाताहून मोहम्मद शमी आणि रिद्धिमान साहा कमर्शियल विमानाने मुंबईत पोहोचतील. त्याचबरोबर, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि अर्जन नगरस्वाला गुजरातहून बाय रोड मुंबईला पोहोचले आहेत.