भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये (Ind Vs Aus 2020) होत असलेला पहिल्या एकदिवस सामना सिडनी ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) खेळवला जात आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा अॅरॉन फिंचचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनी सार्थ ठरवला. कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टिव्हन स्मिथने दमदार शतके झळकावली.
स्टिव्हन स्मिथने दमदार खेळी करताना 66 बॉलमध्ये 105 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत त्याने 11 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार लगावले. मॅक्सवेलनेही तुफानी खेळ केला. त्याने 19 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी केली. या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय बोलर्सचा जोरदार समाचार घेतला. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 25 ओव्हर पार केल्यानंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली. स्मिथ आणि मॅक्सवेलने आक्रमक फटके खेळून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 76 बॉलमध्ये 69, अॅरॉन फिंचने 124 बॉलमध्ये 114, स्टिव्हन स्मिथने 66 बॉलमध्ये 105, ग्लेन मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 धावा काढल्या.
भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलने 10 ओव्हरमध्ये सर्वाधिक 89 धावा दिल्या.तर मोहम्मद शमीने सर्वात कमी 53 धावा दिल्या.