सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2020) यांच्यात आज (मंगळवार) तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 रन्सनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला जिंकण्यासाठी 187 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारताला हे लक्ष्य पार करण्यात अपयश आलं. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 07 बाद 174 एवढ्या धावा करता आल्या. तिसरी आणि अखेरची मॅच जिंकत ऑस्ट्रेलियाने या मालिकेचा शेवट गोड केला. विराट कोहलीची झुंजार 85 धावांची खेळी व्यर्थ गेली. भारताने 3 टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. यानंतर पार पडलेल्या अॅवॉर्ड सोहळ्यात हार्दिक पांड्याचा (hardik pandya) मनाचा मोठेपणा पाहायला मिळाला. (India Vs Aus hardik pandya handed over his man Of the Series Award to bowler T Natrajan)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत हार्दिक पांड्याच्या बहारदार खेळीबद्दल त्याला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार देण्यात आला. मात्र या खऱ्या पुरस्काराचा खरा मानकरी भारताचा बोलर्स टी नटराजन (T Natrajan) आहे, असं सांगत हार्दिकने मॅन ऑफ द सीरीजची ट्रॉफी नटराजनच्या हातात सोपवली. मॅच संपल्यानंतर हार्दिकने नटराजनची स्तुती करणारं ट्विट केलं. “या मालिकेत नटराजनची कामगिरी विशेष लक्षवेधी होती. कठीण परिस्थितीत तू पदार्पणाचा सामना खेळला. त्यानंतर खेळलेल्या सामन्यांत तू तुझी प्रतिभा जगाला दाखवलीस. खरं तर या पुरस्काराचा खरा हकदार तू आहेस”, असं म्हणत हार्दिकने नटराजनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
“नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शानदार कामगिरी केली. यासाठी त्याने खूप कष्ट घेतले होते. त्याच्या कामगिरीतून त्याचे कष्ट आपल्याला दिसून येतील. माझ्या भावा, मॅन ऑफ द सिरीजचा तू खरा हकदार आहेस”, असं ट्विट हार्दिक पांड्याने यानंतर केलं.
Natarajan, you were outstanding this series. To perform brilliantly in difficult conditions on your India debut speaks volumes of your talent and hardwork ? You deserve Man of the Series from my side bhai! Congratulations to #TeamIndia on the win ??? pic.twitter.com/gguk4WIlQD
— hardik pandya (@hardikpandya7) December 8, 2020
हार्दिकने दाखवलेल्या मनाच्या मोठेपणानंतर क्रिकेटप्रेमींनी हार्दिकवर शुभेच्छांचा वर्षाव केला. शब्बास हार्दिक, अशा अनेक कमेंट युझर्सने केल्या. धडाकेबाज क्रिकेट खेळाडू एवढाच हार्दिक माणूस म्हणून मोठा असल्याचं अनेक युझर्सने म्हटलं.
तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत नटराजनने सुंदर गोलंदाजी करत 6 विकेट्स मिळवल्या. तसंच या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम झाला. तर दुसरीकडे 3 सामन्यांत हार्दिकने 156 च्या स्ट्राईक रेटने 156 धावा केल्या. खास करुन दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात हार्दिकने ज्या प्रकारे फटकेबाजी करुन भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला, त्याबद्दल त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
(India Vs Aus hardik pandya handed over his man Of the Series Award to bowler T Natrajan)
संबंधित बातम्या