मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसावर पूर्णपणे टीम इंडियाचं वर्चस्व राहिलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या होती. टीम इंडियाकडून मैदानात चेतेश्वर पुजारा 7* आणि शुभमन गिल 28* धावांवर नाबाद आहेत. लाईव्ह स्कोअरकार्ड
त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशाने आणि ट्रॅव्हिस हेडने अनुक्रमे 48 आणि 38 धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेटेस घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विनने 3 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच मोहम्म सिराजने 2 तर रवींद्र जाडेजाने 1 विकेट मिळवला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या कांगारुंना टीम इंडियाने सुरुवातीपासून धक्के दिले. ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने विकेट गमावले. ऑस्ट्रेलियाने पहिले 3 झटपट गमावले. यामुळे ऑस्ट्रेलियाची 35-3 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर मार्नस लाबुशाने आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. पण ही जोडी बुमराहला यश आले. बुमराहने ट्रॅव्हिस हेडला 38 धावांवर बाद केलं. ट्रॅव्हिसने 92 चेंडूत 4 चौकांरासह 38 धावा केल्या.
हेडनंतर काही ओव्हरनंतर मार्नस लाबुशानेही बाद झाला. लाबुशानेला मोहम्मद सिराजने आऊट केलं. लाबुशानेने 132 चेंडूत 4 चौकांरसह 48 धावा केल्या. ही जोडी माघारी गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. ऑस्ट्रेलियाने एकामागोमाग एक विकेट टाकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला.
टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 खेळाडू : टीम पेन (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), जो बर्न्स, मारनस लबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नॅथन लॉयन आणि जोश हेझलवूड