मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाने 2 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाचा 133-6 (66 Ov) अशी स्थिती होती. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि कॅमरॉन ग्रीन अनुक्रमे 15 आणि 17 धावांवर नाबाद आहेत. टीम इंडियाचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून धक्के दिले. (india vs australia 2020 2nd test day 3rd live cricket score updates online in marathi at mcg)
Stumps on Day 3 of the 2nd Test.
Australia 195 & 133/6, lead India (326) by 2 runs.
Scorecard – https://t.co/HL6BBFdHmw #AUSvIND pic.twitter.com/VZb5xUUcRd
— BCCI (@BCCI) December 28, 2020
उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. उमेशने जो बर्न्सला 4 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशानेने दुसऱ्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. ही जोडी फिरीकीपटून रवीचंद्रन अश्विनने तोडली. अश्विनने लाबुशानेला कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हाती कॅच आऊट केलं. लाबुशानेने 28 धावा केल्या.
यानंतर स्टीव्ह स्मिथच्या रुपात ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का लागला. बुमराहने स्मिथला बोल्ड केलं. स्मिथने दुसऱ्या डावात 8 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया एका बाजूला विकेट गमावत होती. मात्र सलामीवीर मॅथ्यू वेडने एक बाजू लावून धरली. वेड 40 धावांवर खेळत होता. वेड पूर्णपणे सेट झाला होता. यामुळे वेड डोकेदुखी ठरत होता. मात्र फिरकीपटू रवींद्र जाडेजाने टीम इंडियाच्या मार्गातील अडथळा दूर केला. जाडेजाने वेडला एलबीडबल्यू आऊट केलं.
वेड मागोमाग ऑस्ट्रेलियाने पाचवी विकेटही गमावला. मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला 17 धावांवर आऊट केलं. हेडनंतर कर्णधार टीम पेनला जाडेजाने माघारी पाठवलं. पेनने केवळ 1 धाव केली.
ऑस्ट्रेलियाने एकामागोमाग एक असे एकूण 6 विकेट गमावले. यामुळे कांगारुंची 99-6 अशी स्थिती झाली. अडचणीत असलेल्या कांगारुंचा कॅमरॉन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या दिवसखेर 34 धावांची नाबाद भागीदारी केली.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना एकूण 6 धक्के दिले. रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा नाबाद असलेले अजिंक्य रहाणे-रवींद्र जाडेजा ही जोडी मैदानात आली. दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाची धावसंख्या 277-5 इतकी होती. इथून पुढे खेळाला सुरुवात झाली. टीम इंडियाला मोठी आघाडी मिळेल, अशी आशा होती. मात्र कांगारुंनी टीम इंडियाचे झटपट 5 विकेट झटकले.
शतकवीर रहाणे दुर्देवीरित्या रन आऊट झाला. रहाणेने 223 चेंडूंत 12 चौकारांसह 112 धावा केल्या. रहाणे मागोमाग जाडेजाही आऊट झाला. जाडेजाने शानदार अर्धशतक लगावलं. जाडेजाने 159 चेंडूत 3 चौकारांसह 57 धावा केल्या. यानंतर उमेश यादवच्या रुपात टीम इंडियाला आठवा झटका बसला. अश्विनने 14 धावा केल्या. तर बुमराह शून्यावर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने 2 विकेट्स तर जोश हेजलवूडने 1 विकेट्स घेतली.
तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 133-6 (66 Overs)
कॅमरॉन ग्रीन -17 *, पॅट कमिन्स-15*