सिडनी : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (6 डिसेंबर) दुसरी टी 20 मॅच खेळण्यात येणार आहे. पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक असणार आहे. ऑस्ट्रेलियावर या सामन्यात ‘करो या मरो’ची स्थिती आहे. त्यातच आधीच एश्टन एगर, डेव्हिड वॉर्नर यासारख्या तगड्या खेळाडूंना टी 20 मालिकेला मुकावे लागले आहे. यातच आता ऑस्ट्रेलियाला आणखी मोठा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या मलिकेतून माघार घेतली आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. india vs australia 2020 Mitchell Starc withdrawn from T 20 series due to family illness
How big a loss is this for Australia?#AUSvIND
— ICC (@ICC) December 6, 2020
ऑस्ट्रेलिया आधीच अडचणीत आहे. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. अशा निर्णायक स्थितीत स्टार्कने माघार का घेतली, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. माघार घेण्याचे कारण ही तसेच आहे. स्टार्कच्या कुटुंबातील सदस्याची प्रकृती स्थिर नाही. या कारणामुळे स्टार्कने माघार घेतली आहे. याबाबतची कल्पना स्टार्कने ऑस्ट्रेलियाला टीम मॅनेजमेटंला दिली आहे. जगामध्ये कुटुंबाशिवाय काही महत्वाचं नाही. याबाबत स्टार्कही अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी दिली.
JUST IN: Mitchell Starc has withdrawn from the #AUSvIND T20I squad after being informed about a family illness.
There will be no replacement for the fast bowler in the squad, since Andrew Tye and Daniel Sams are already a part of it. pic.twitter.com/fLaZfS5xkW
— ICC (@ICC) December 6, 2020
स्टार्क केव्हापर्यंत संघात कमबॅक करणार याबाबक प्रशिक्षक लँगर यांनी कोणतीच माहिती दिली नाही. “आम्ही स्टार्कला हवा तेवढा वेळ दिलाय. स्टार्क त्याच्या सोयीने संघात कमबॅक करु शकतो”, अशी प्रतिक्रिया लँगर यांनी दिली. यामुळे स्टार्क कसोटी मालिकेत खेळणार की नाही,याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दुखापतीमुळे टी 20 मालिकेला मुकावं लागलंय. टीम इंडियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वॉर्नरच्या उजव्या मांडीचे स्नायु दुखावले होते. यामुळे वॉर्नरला मालिकेतून बाहेर पडावे लागले. तसेच एश्टन एगरलाही टीम इंडियाविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळेस उजव्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे एगरऐवजी संघात ऑफ स्पीनर नॅथन लॉयनला (Nathan Lyon)संधी देण्यात आली आहे. तसेच नॅथनला याआधीच टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिकेसाठीही संधी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
India vs Australia 2020 2nd T20 Updates : टीम इंडियाचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
india vs australia 2020 Mitchell Starc withdrawn from T 20 series due to family illness