VIDEO : भारताविरोधात ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून बॉल टॅम्परिंग?

| Updated on: Jun 10, 2019 | 11:05 AM

भारताविरोधातील कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाज अॅडम झंपा याने बॉल टॅम्परिंग केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO : भारताविरोधात ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून बॉल टॅम्परिंग?
Follow us on

INDvsAUS  लंडन : ओव्हल मैदानात काल (9 जून)  खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला. सलामीवीर शिखर धवनच्या 117 , कर्णधार विराट कोहलीच्या 82 आणि रोहित शर्माच्या 57 धावांच्या जोरावर, भारताने कांगारुंसमोर 353 धावांच तगडं आव्हान उभं केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियने टीमचा पार धुव्वा उडवला. कांगारुंना भारताने 50 षटकात 316 धावांत रोखलं. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाज अॅडम झंपा याने बॉल टॅम्परिंग केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे क्रिकेट विश्वचषकात खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, यात झंपा हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच याच्याकडे जातो. त्यावेळी त्याच्या उजव्या हातात चेंडू दिसतो आहे. त्यानंतर तो डावा हात खिशात टाकतो आणि तो हात खिशातून बाहेर काढल्यानंतर चेंडूवर काहीतरी घासताना दिसत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे तो चेंडूवर काहीतरी घासत असल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलिया गोलंदाज झंपाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पुन्हा एकदा बॉल टॅम्परिंग केल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट केल्या आहेत. झंपा नक्की काय करतो आहे असे प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारले आहे.

याआधीही ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्यावर्षी (2018) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरोन बैनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. हे आरोप सिद्ध झाल्यानंतर बैनक्रॉफ्टला 9 महिने तर स्मिथ आणि वॉर्नरला एक वर्ष क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती.

बॉल टेम्परिंग म्हणजे काय?

आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या नियमानुसार, क्रिकेटच्या चेंडूचा आकार बदलणे म्हणजे बॉल टॅम्परिंग. नखाने, कोणत्याही टोकदार वस्तूने चेंडूवर ओरखडणे, च्यूईंग गम किंवा त्यावर चिकट टेप लावणे या अशाप्रकारच्या कृती बॉल टॅम्परिंग प्रकारात मोडतात. अनेक खेळाडू चेंडू स्वींग व्हावा यामुळे हे करत असतो.

काय होते कारवाई ?

आयसीसीच्या नियमानुसार बॉल टॅम्परिंग हा दंडनीय अपराध आणि गुन्हा आहे. अशाप्रकारे कोणताही खेळाडून बॉल टॅम्परिंग करता आढळला, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच आयसीसी खेळण्यासही त्याला क्रिकेट खेळण्यास बंदी घालते. तसेच बॉल टॅम्परिंग करताना खेळाडूंच्या टेबल पाँईंटमध्ये चार नकारात्मक गुण जमा होतात.

संबंधित बातम्या : 

World Cup : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

World Cup : धवनची ‘गब्बर’गिरी, सचिनशी बरोबरी, भारताचे अनेक विक्रम