मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यात गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे शमीला मालिकेला मुकावे लागले. विराट पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतला. त्यामुळे टीम इंडिया खिंडीत सापडली होती. मात्र टीम इंडियासाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिटमॅन रोहित शर्माबद्दल (Hitman Rohit Sharma) मोठी अपडेट आली आहे. रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाशी जोडला जाणार आहे. (india vs australia hitman rohit sharma will join team india camp on 30 december)
मिळालेल्या माहितीनुसार , रोहित 30 डिसेंबरला टीम इंडियाशी जोडला जाणार आहे. रोहितचे ऑस्ट्रेलियातील क्वारंटईन कालावधी लवकरच पूर्ण होत आहे. त्यामुळे रोहित लवकरच टीम इंडियासोबत दिसणार आहे. दुखापतग्रस्त असेलल्या रोहितने शुक्रवार 11 डिसेंबरला एनसीए (National Cricket Academy) मध्ये फिटनेस टेस्ट दिली होती. या फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर रोहित 16 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. रोहित ऑस्ट्रेलियामध्ये पोहचल्यानंतर क्वारंटाईन आहे. रोहितला क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर टीम इंडियाच्या बायो बबलमध्ये जाण्याची परवानगी मिळेल.
रोहितच्या पुनरागमनाच्या बातमीमुळे टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोहितला केवळ आपल्या सहकाऱ्यांसोबत राहता येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील शेवटच्या 2 कसोटी खेळता येणार की नाही, हे अजूनही ठरलेलं नाही. रोहितला या सामन्यात खेळण्यासाठी आणखी एक फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. रोहित या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच ऑस्ट्रेलियाविरोधात खेळता येईल.
रोहित टीम इंडियाचा नियमित ओपनर आहे. टीम इंडियाच्या सलामीवीरांनी पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरोधात चांगली कामगिरी करेल, अशी आशा टीम इंडिया आणि त्याच्या चाहत्यांना असणार आहे.
सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा जोर वाढला आहे. तिसरा कसोटी सामन्यांचं आयोजन हे सिडनीत करण्यात आलं आहे. डिसेंबर 7 पासून तिसरा सामना खेळण्यात येणार आहे. सिडनीतील कोरोनाचा जोर न ओसरल्यास हा तिसरा सामन्याचं आयोजन दुसऱ्या ठिकाणी केलं जाऊ शकतं.
क्रिकबझनुसार, रोहितला मेलबर्नमध्ये क्वारंटाईन ची सोय करावी, अशी विनंती बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला केली होती. मात्र ऑस्ट्रेलिया बोर्डने ही विनंती अमान्य केली. रोहितला स्थानिक प्रशासनाने दिलेल्या ठिकाणीच क्वारंटाईन रहावं लागेल, असं म्हणत ऑस्ट्रेलिया क्रिकेटने बीसीसीआयची विनंती फेटाळली. दुसरा सामना हा मेलबर्नमध्ये 26-30 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. रोहित जर मेलबर्नध्ये क्वारंटाईन असता, तर त्याला थेट टीम इंडियासोबत जुडता आले असते.
रोहितला सिडनीमध्ये एका फ्लॅटमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. रोहितवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. या फ्लॅटमध्ये रोहितला वर्कआऊट करता यावा, या दृष्टीने नियोजन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
हिटमॅन रोहित शर्मा 14 दिवसांपासून एकाच खोलीत! काय आहे कारण?
(india vs australia hitman rohit sharma will join team india camp on 30 december)