IndvsAus: हनुमा विहारी कसा पार करणार पराभवाचा ‘द्रोणागिरी’?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

पर्थ: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत टीम इंडिया बिकट परिस्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना, चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 5 बाद 112 अशी झाली आहे. भारताला विजयासाठी अद्याप तब्बल 175 धावांची गरज आहे. तर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सची आवश्यकता आहे. सध्या हनुमा विहारी 24 आणि ऋषभ पंत 9 धावांवर मैदानात […]

IndvsAus: हनुमा विहारी कसा पार करणार पराभवाचा द्रोणागिरी?
Follow us on

पर्थ: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत टीम इंडिया बिकट परिस्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना, चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 5 बाद 112 अशी झाली आहे. भारताला विजयासाठी अद्याप तब्बल 175 धावांची गरज आहे. तर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सची आवश्यकता आहे. सध्या हनुमा विहारी 24 आणि ऋषभ पंत 9 धावांवर मैदानात आहेत. या दोघांवरच आता भारतीय संघाची मदार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 287 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची चहापानापर्यंतची अवस्था 2 बाद 15 अशी बिकट झाली. सलामीवीर के एल राहुल शून्य आणि हुकमी फलंदाज चेतेश्वर पुजारा 4 धावा करुन माघारी परतल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली. चहापानापर्यंत खेळ थांबला तेव्हा विराट कोहली आणि मुरली विजय मैदानात होते. चहापानानंतर लगेचच विराट कोहलीला 17 धावांवर नॅथन लायनने बाद केलं. तर लायननेच मुरली विजयला 20 धावांवर माघारी धाडून भारताला चौथा धक्का दिला. मुरली विजय बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 4 बाद 55 अशी होती.

मुरली विजय बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी करता आली नाही. जेमतेम 30 धावा करुन रहाणेही मागे परतल्याने भारताची अवस्था 5 बाद 98 अशी झाली. त्यानंतर आता हनुमा विहारी आणि ऋषभ पंतवर भारताची धुरा आहे. उद्या कसोटीचा शेवटचा दिवस आहे.


या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 326 धावा केल्या. त्यानंतर भारताचा डाव 283 धावात आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला 43 धावांची आघाडी मिळाली. मग ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 243 धावात आटोपल्याने भारतासमोर एकूण 287 धावांचं लक्ष्य आहे.

दरम्यान दुसऱ्या डावातही के एल राहुलला काहीच करता आलं नाही. मिचेल स्टार्कने राहुलला शून्यावर बाद केलं. तर संघाची धावसंख्या 13 झाली असताना हेजलवूडने पुजाराला (4) टिम पेनकरवी झेलबाद केलं. के एल राहुल पहिल्या डावात 2 धावांवर बाद झाला होता.

त्याआधी मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 283 धावात गुंडाळला. मोहम्मद शमीने तब्बल 6 फलंदाजांना तंबूत धाडत, करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली. पाचपेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम शमीने चौथ्यांदा केला. याशिवाय जसप्रीत बुमराने 39 धावा देत 3 आणि इशांत शर्माने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर कर्णधार टिम पेन (37), अरॉन फिंच (25), मार्कस हॅरिस (20), शॉन मार्श (5), पीटर हँडसकोंब (13) धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका
पहिला सामना – 6 डिसेंबर
दुसरा सामना – 14 डिसेंबर
तिसरा सामना – 26 डिसेंबर
चौथा सामना – 3 जानेवारी
वन डे मालिका
पहिला सामना – 12 जानेवारी
दुसरा सामना – 15 जानेवारी
तिसरा सामना – 18 जानेवारी

संबंधित बातम्या 

बाद नसतानाही विराटला माघारी पाठवलं, पंचांवर चाहत्यांचा संताप  

AUSvsIND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी 

विराट कोहलीने सचिनचा आणखी एक विक्रम मोडला 

अश्विन, रोहित शर्मा बाहेर, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर  

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार