India vs Bangladesh: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू टीम बाहेर

| Updated on: Dec 03, 2022 | 10:59 AM

टीम इंडियाच्या महत्त्वाच्या गोलंदाजाला दुखापत, रोहित शर्मा, राहूल द्रविडची डोकेदुखी वाढली

India vs Bangladesh: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू टीम बाहेर
Team india
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: टीम इंडियाचा (India) न्यूझिलंड दौरा नुकताच संपला. एकदिवसीय मालिका न्यूझिलंडने (NZ) जिंकली. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. परंतु बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यात पुन्हा त्यांना संधी देण्यात आल्याने पुन्हा ते सिनियर खेळाडू जुनियर खेळाडूंसोबत मैदानात पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा एक महत्त्वाचा गोलंदाज जखमी झाल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे.

टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाजा मोहम्मद शमीला दुखापत झाली आहे. शमीच्या हाताला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे एकदिवसीय मालिकेत तो खेळणार नाही. परंतु कसोटीपर्यंत त्याची दुखापत बरी होईल असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत शमीला आराम मिळणार आहे.

आशिया चषकापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे टीम इंडियातील गोलंदाजांवरती जोरदार टीका होत आहे. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. बांगलादेश दौऱ्यात खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी (जखमी), मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन