पुणे : टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या एकदिवसीय सामन्यात 318 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. भारताकडून शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. पण चमकला तो कृणाल पंड्या. पंड्याने आपल्या पदार्पणातील सामन्यात शानदार खेळी केली. यासह कृणालने पदार्पणातील सामन्यातच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (india vs england 1st odi 2021 krunal pandya scored fifty in debut match)
5⃣0⃣ on ODI debut! ??@krunalpandya24 notches up a 26-ball half-century. ??
Cracking knock from the left-hander as #TeamIndia move closer to 300! ??@Paytm #INDvENG
Follow the match ? https://t.co/MiuL1livUt pic.twitter.com/JHRjNmbiYc
— BCCI (@BCCI) March 23, 2021
कृणालने एकदिवसीय पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. कृणालने इंग्लंडच्या जॉन मॉरीस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मॉरीस यांनी 1990 मध्ये 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर कृणालने 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. कृणालने एकूण 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली.
Century stand ✅
Half centuries for @klrahul11 & @krunalpandya24 ✅
300+ on the board ✅Brilliant batting display from #TeamIndia as they post 317/5 in 50 overs. @Paytm #INDvENG pic.twitter.com/9iU3lmZQBz
— BCCI (@BCCI) March 23, 2021
केएल राहुल आणि कृणालने 6 व्या विकेटसाठी नाबाद 112 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या दरम्यान केएल आणि कृणालने वैयक्तिक अर्धशतक झळकावली. शिखर धवन आणि हार्दिक पंड्या झटपट आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 205-5 अशी स्थिती झाली होती. पण या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरत जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी साकरलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताला 50 षटकांमध्ये 317 धावांपर्यंत मजल मारता आली.
गब्बर शिखर धवनचे अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं. धवनला शतकासाठी अवघ्या 2 धावांची गरज होती. तो 98 धावांवर खेळत होता. धवनला लवकरात लवकर शतक लावायचं होतं. मात्र बेन स्टोक्सच्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर शिखरने कर्णधार इयोन मॉर्गनच्या दिशेने फटका मारला. मॉर्गनने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. अशाप्रकारे धवन आऊट झाला. धवनने 106 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारासंह 98 धावांची खेळी केली.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिर पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद आणि मार्क वुड.
संबंधित बातम्या :
(india vs england 1st odi 2021 krunal pandya scored fifty in debut match)