अहमदाबाद : इंग्लंडने टी 20 मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (india vs england 1st t20 live score updates in marathi narendra modi stadium ahmedabad ind vs eng 2021 t20i cricket match news online) लाईव्ह स्कोअरकार्ड
इंग्लंडने या टी 20 मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला दिलेले विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. केएल राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली स्वसतात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियाचा डाव सावरला. श्रेयसने फटकेबाजी करत 48 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 67 धावांची खेळी केली
इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा जोफ्रा आर्चरला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. जोफ्राने 4 ओव्हरमध्ये 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे यामध्ये जोफ्राने 1 मेडन ओव्हर टाकली.
इंंग्लंडने टी 20 मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात भारतावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान इंग्लंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर जॉस बटलरने 28 धावांची खेळी केली. तर डेव्हीड मलान आणि जॉनी बेयरस्टो या दोघांनी अनुक्रमे नाबाद 24 आणि 26 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
England win ?
They chase down the target of 125 comfortably and win the first #INDvENG T20I by eight wickets.
Scorecard: https://t.co/c6nwSdBr8j pic.twitter.com/mTYwnbkvYA
— ICC (@ICC) March 12, 2021
वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. सुंदरने जेसन रॉयला आऊट केलं आहे. रॉयने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावांची खेळी केली.
फिरकीपटू युजवेंद्र चहलने इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. चहलने जोस बटलरला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. बटलरने 28 धावा केल्या.
1st T20I. 7.6: WICKET! J Buttler (28) is out, lbw Yuzvendra Chahal, 72/1 https://t.co/XYV4KlVERM #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) March 12, 2021
विजयी आव्हानाचे पाठलाग करताना इंग्लंडने शानदार सुरुवात केली आहे. जोस बटलर आणि जेसन रॉय या सलामी जोडीने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये जोरदार फटेकाबाजी केली. यासह या जोडीने सलामी अर्धशतकी भागीदारी केली.
Jason Roy and Jos Buttler help England post 50/0 in the Powerplay!
Can India break the opening stand? #INDvENG | https://t.co/c6nwSdBr8j pic.twitter.com/DCMYSBb5di
— ICC (@ICC) March 12, 2021
केएल राहुने सीमारेषेवर अफलातून फिल्डिंग केली आहे. यासह केएलने टीम इंडियासाठी 4 धावा वाचवल्या आहेत. अक्षर पटेल सामन्यातील पाचवी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर जोरदार फटका मारला. हा फटका सिक्स होता. पण केएलने हवेत झेप घेत तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला. यामुळे इंग्लंडला केवळ 2 धावा मिळाल्या. यामसह केएलने भारतासाठी 4 धावा वाचवल्या.
Departs early with the bat and still makes his mark by an excellent save at the boundary. ?
Take a bow, @klrahul11 ????#CaptainPunjab • #INDvENG pic.twitter.com/5WhcLKfc0I
— Lions Den | PBKS Fan Club (@LionsDenPBKS) March 12, 2021
इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे.
टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 124 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने 48 चेंडूत 67 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याशिवाय रिषभ पंतने 21 तर हार्दिक पांड्याने 19 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
A brilliant bowling performance from England as they restrict India to 124/7.
Shreyas Iyer top-scored for the hosts with an impressive 48-ball 67.#INDvENG | https://t.co/c6nwSdBr8j pic.twitter.com/26hL2gcV9M
— ICC (@ICC) March 12, 2021
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूर मोठा फटका मारण्याच्या नादात पहिल्याच चेंडूवर आऊट झाला.
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. हार्दिक पांड्या आऊट झाल आहे. पांड्याने 21 चेंडूत 19 धावा केल्या.
श्रेयस अय्यरने झुंजार अर्धशतक झळकावलं आहे. श्रेयसने 36 चेंडूत ही कामगिरी केली आहे. श्रेयसच्या टी 20 कारकिर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं आहे.
5⃣0⃣ & going strong! ??
3⃣rd T20I half-century for @ShreyasIyer15 in 36 balls! ?? @Paytm #INDvENG #TeamIndia move closer to 100.
Follow the match ? https://t.co/XYV4KmdfJk pic.twitter.com/nH1H70xI0X
— BCCI (@BCCI) March 12, 2021
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. तडाखेदार बॅटिंग करत असलेला रिषभ पंत आऊट झाला आहे. पंत बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला आहे.
टीम इंडियाने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 22 धावा केल्या आहेत. दरम्यान रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर ही युवा जोडी मैदानात खेळत आहे.
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. सलामीवीर गब्बर शिखर धवन आऊट झाला आहे. धवनच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला आहे. यामुळे टीम इंडियाची 20-3 अशी स्थिती झाली आहे. दरम्यान धवननंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.
रिषभ पंतने पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेचला आहे. पंतने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप खेचत षटकार खेचल. त्यानंतर पुढील चेंडूवर चौकार खेचला. अशा प्रकारे पंतने 2 चेंडूत 10 धावा केल्या.
रिषभ पंतने टीम इंडियाकडून पहिला चौकार लगावला आहे. सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर आदिल राशिदच्या चेंडूवर चौकार खेचला आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3-2 अशी झाली आहे. दरम्यान विराटनंतर रिषभ पंत मैदानात आला आहे.
टीम इंडियाची खराब सुरुवात झाली आहे. सलामीवीर के एल राहुल 1 धावा करुन माघारी परतला आहे. केएल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे.
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. शिखर धवन आणि केएल राहुल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हीड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल
इंग्लंडने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर
आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 14 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी उभयसंघांनी प्रत्येकी 7 मॅचेस जिंकल्या आहेत. यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यामुळे या दोन्ही संघात ‘काटे की टक्कर’ असणार आहे.
6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे. त्यामुळे टॉसचा बॉस कोण ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.