चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs england 1st test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये ( M A Chidambaram) पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेली दुखापतीची मालिका भारतातही अजून कायम आहे. टीम इंडियाचा युवा फिरकीपटू अक्षर पटेलला (Axar Patel) दुखापत झाली आहे. अक्षरला दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी शाबाज नदीम (shahbaz nadeem) आणि राहुल चहर (rahul chahar) या फिरकी जोडीला संघात स्थान देण्यात आलं आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (india vs england 1st test axar patel ruled out of first test shahbaz nadeem and rahul chahar added squad)
Axar Patel ruled out of first @Paytm #INDvENG Test; Shahbaz Nadeem & Rahul Chahar added to India squad
More details ? https://t.co/2uk74iyVpW pic.twitter.com/MpUdUGMauB
— BCCI (@BCCI) February 5, 2021
“पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला अर्थात गुरुवारी (4 फेब्रुवारी) अक्षर नेट्समध्ये सराव करत होता. या सरावादरम्यान डावा गुडघा दुखत असल्याची तक्रार अक्षरने केली. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने पाहणी केली. दरम्यान अक्षर पटेलवर फिजीओ टीम लक्ष देऊन आहे”, अशी माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजालाही दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. जाडेजाला ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या कसोटीतील फलंदाजीदरम्यान दुखापत झाली होती. यामुळे जाडेजाच्या बोटाला फ्रॅक्चर झालं. यामुळे त्याला आधी पहिल्या 2 कसोटीला मुकावे लागले होते. मात्र डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याने जाडेजाला संपूर्ण मालिकेला मुकावे लागले.
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज झॅक क्रॉवलेनेही दुखापतीमुळे पहिल्या 2 कसोटींमधून माघार घेतली आहे. झॅकला मनगटाला दुखापत झाली होती. यामुळे त्याने माघार घेतली.
दरम्यान चेन्नईची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अनुकूल आहे. दोन्ही संघांकडे तोडीसतोड आणि अनुभवी फिरकीपटू आहेत. यामुळे या पीचवर कोणते फिरकीपटू यशस्वी ठरतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि शाहबाज नदीम.
असा आहे इंग्लंडचा संघ : रॉरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, डेनियल लॉरेन्स, जो रूट, बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर, डॉमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन.
संबंधित बातम्या :
(india vs england 1st test axar patel ruled out of first test shahbaz nadeem and rahul chahar added squad)