चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात आजपासून (5 फेब्रुवारी) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामन्याचे आयोजन चेन्नईतील एम ए चिदंबरम (M A Chidambaram) स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया भारतात खेळणार आहे. इंग्लंड आणि टीम इंडियाने गत कसोटी मालिकेत यजमान संघाचा त्यांच्याच भूमित पराभव केला आहे. या उभय संघाचा विश्वास वाढलेला आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये या कसोटी मालिकेसाठी उत्साहाचं वातावरण आहे. या कसोटी निमित्ताने दोन्ही संघांची जमेची बाजू आपण पाहणार आहोत. (india vs england 1st test chennai m a chidambaram stadium match preview)
टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. यामुळे टीम इंडियासाठी हा प्लस पॉइंट आहे. त्यात नियमित कर्णधार विराट कोहली, दुखापतग्रस्त गोलंदाज इशांत शर्मा आणि ओपनर के एल राहुल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पंड्यानेही कमबॅक केलं आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न कर्णधार कोहली आणि टीम मॅनेजमेंट समोर आहे.
टीम इंडियाचे सर्वच खेळाडू हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून चांगल्या फॉर्मात आहेत. त्यात अनुभवी विराट आणि इशांतचे पुनरागमन झाले आहे. यामुळे बॅटिंग आणि बोलिंग साईड आणखी मजबूत झाली आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर टीम इंडियाचे तगडे आव्हान असणार आहे.
तसेच इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचंही कमबॅक झालं आहे. स्टोक्स बॅटिंग आणि बोलिंग अशा दोन्ही आघांड्यावर दमदार कामगिरी करतो. तो आयपीएलमध्ये भारतात खेळला आहे. यामुळे त्याला इथल्या खेळपट्ट्यांची जाण आहे. यामुळे स्टोक्सला रोखण्याचे आवाहन भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे. तसेच आर्चर हा इंग्लंडच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. यामुळे आर्चरपासून सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.
जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट बोर्ड हे इंग्लंडचे महत्वाचे गोलंदाज आहेत. या दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 1100 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनचा हा 5 वा भारत दौरा आहे. यामुळे या दोन्ही गोलंदाजांविरुद्ध खेळण्यासाठी रणनिती आखून खेळणं गरजेचं असणार आहे.
उभयसंघात आतापर्यंत एकूण 122 कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी 47 सामने हे इंग्लंडने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 26 मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे. तसेच 49 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
इंग्लंडच्या 2021 या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईमधील एम ए चिदंबरमध्ये खेळण्यात येणार आहेत. या चेन्नईमध्ये टेस्ट सामन्यात दोन्ही संघांचा 9 वेळा आमनासामना झाला आहे. या 9 पैकी 5 सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केलं आहे. तर इंग्लंडने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे.
नवीन क्यूरेटरने चेन्नईच्या मैदानातील खेळपट्टीची जबाबदारी स्वीकारली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार, पीचवर थोड्या प्रमाणात गवत आहे. यामुळे सामन्याच्या दिवशी सकाळी खेळपट्टी कशी असेल हे पाहणे मजेदार ठरणार आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरेल असं म्हटलं जात आहे. यामुळे या सामन्यात दोन्ही संघापैकी कोणत्या संघाचे फिरकी गोलंदाज यशस्वी ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
संबंधित बातम्या :
Special Story | टीम इंडिया की इंग्लंड, कसोटी मालिकेत वरचढ कोण? पाहा आकडेवारी
(india vs england 1st test chennai m a chidambaram stadium match preview)