चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यातील कसोटी मालिकेला आता काही अवघे तास शिल्लक राहिले आहेत. या दोन्ही संघांनी याआधीच्या कसोटी मालिकेत विजय मिळवलेला आहे. यामुळे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडण्यासाठी सज्ज आहेत. हा पहिला सामना किती वाजता सुरु होणार आहे, कुठे खेळण्यात येणार आहे, याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. (india vs england 1st test series 2021 chennai live streaming when where to watch match from ma chidambaram stadium india time)
या पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस करण्यात येईल. तर साडे आठ वाजता प्री मॅच प्रोग्रॅमला सुरुवात होणार आहे. यामध्ये क्रिकेट चाहत्यांना एक्सपर्टकडून अधिक माहिती जाणून घेता येणार आहे.
After a looooong wait, cricket returns to India! ? ??
Get ready for the Paytm #INDvENG Series – action begins from Feb 5! @BCCI pic.twitter.com/SwznuQfzxd
— Paytm (@Paytm) February 4, 2021
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी मॅच चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium Chennai) खेळण्यात येणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना ही मॅच स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसेच Disney+Hotstar VIP या अॅपवरही लाईव्ह मॅच पाहता येईल. तसेच टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवरही क्रिकेट चाहत्यांना सामन्याचे लाईव्ह अपडेट्स घेता येणार आहेत.
या सामन्यात अनिल कुमार चौधरी आणि नितीन मेनन हे फिल्ड अंपायरची भूमिका बजावणार आहेत. तर चेटिथोडी शमशुद्दीन हे थर्ड अंपायर असणार आहेत. जावगल श्रीनाथ हे सामनाधिकारी असणार आहेत. सामन्यादरम्यान क्रिकेटच्या नियमांनुसारच खेळण्यात येत की नाही, हे पाहणं सामनाधिकाऱ्यांचं काम असतं.
दरम्यान अजूनही दोन्ही संघांकडून पहिल्या कसोटीसाठी अंतिम 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली नाही.
टीम इंडिया :
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
संबंधित बातम्या :
(india vs england 1st test series 2021 chennai live streaming when where to watch match from ma chidambaram stadium india time)