India vs England 1st Odi Playing 11 | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाला संधी कोणाला डच्चू?

| Updated on: Mar 22, 2021 | 11:42 AM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 23 मार्चला पहिला एकदिवसीय सामना (india vs england 2021 1st odi) खेळवण्यात येणार आहे. या मॅचचे आयोजन पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहेत.

India vs England 1st Odi Playing 11 | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाला संधी कोणाला डच्चू?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 23 मार्चला पहिला एकदिवसीय सामना (india vs england 2021 1st odi) खेळवण्यात येणार आहे. या मॅचचे आयोजन (team india playing eleven) पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहेत.
Follow us on

पुणे : टीम इंडियाने भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडला (England  Tour India 2021) कसोटी आणि त्यानंतर टी 20 मालिकेत पराभूत केलं. यानंतर आता उभय संघात एकदिवसीय (India vs England 1st Odi) मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय मालिका एकूण 3 सामन्यांची असणार आहे. हे सर्व सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association Stadium) गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सीरिजसाठी विराटसेना पुण्यात दाखल झाली आहे. पहिला सामना 23 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असणार आहे. या सामन्यासाठी उभय संघांनी कंबर कसली आहे. (india vs england 2021 1st odi prediction of team india playing eleven at pune)

पराभवाने सुरुवात, विजयाने शेवट

टीम इंडियाच्या मागील 3 मालिकांची सुरुवात पराभवाने झाली. मात्र त्यानंतर भारताने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं. हे आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे टीम इंडियाचा या एकदिवसीय मालिकेत यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा मानस असणार आहे. तर इंग्लंडची भारत दौऱ्यातील ही शेवटची मालिका आहे. इंग्लंडला कसोटी आणि त्यानंतर टी 20 मालिकेत पराभूत व्हावं लागंल. त्यामुळे एकदिवसीय मालिका जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न इंग्रजांचा असणार आहे.

भारताला पहिल्या वनडे सामन्यात चांगल्या प्लेईंग इलेव्हनसोबत मैदानात उतरावं लागेल. टीम इंडियामध्ये तोडीसतोड खेळाडू आहेत. त्यामुळे विराटसमोरही कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही, हे मोठे आव्हान असणार आहे.

सूर्यकुमारला पदार्पणाची संधीची शक्यता

मुंबईकर सूर्यकुमार यादवची इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याने टी 20 मालिकेतील दोन्ही सामन्यात आपल्या फटकेबाजीने त्याच्यात असलेलं कौशल्य दाखवून दिलं. त्याने आपल्या खेळीने टीम मॅनेजमेंट आणि कर्णधाराला प्रभावित केलं. यासह त्याने एकदिवसीय मालिकेसाठीही दावेदारी सिद्धही केली आणि यशस्वी झाला. सूर्या फलंदाजासह उत्तम फिल्डरही आहे. त्यामुळे सूर्याला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

मधली फळी मजबूत करणार

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर सलामी करण्याची जबाबदारी असेल. तर सूर्यकुमारसह विराट, श्रेयस आणि रिषभ पंत यांच्यावल मधल्या फळीची जबाबदारी असेल. हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडेल. तसेच गोलंदाजाची जबाबदारी 3 वेगवान आणि 1 फिरकी गोलंदाजावर असेल.

पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाचा संभावित संघ

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, टी. नटराजन आणि युजवेंद्र चहल.

इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

संबंधित बातम्या :

India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची घोषणा

India vs England Odi Series | टी 20 मालिकेनंतर इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज, विराटसेना पुण्यात दाखल

(india vs england 2021 1st odi prediction of team india playing eleven at pune)