Washington Sundar | वॉशिंग्टनची नाबाद 82 धावांची ‘सुंदर’ खेळी, इतर खेळाडूंमुळे शतकाची संधी हुकली, नेटकऱ्यांकडून संताप

| Updated on: Feb 08, 2021 | 2:05 PM

वॉशिंग्टन सुंदरने (washington sundar) 138 चेंडूत 2 सिक्स आणि 12 चौकारांसह नाबाद 85 धावा केल्या.

Washington Sundar | वॉशिंग्टनची नाबाद 82 धावांची सुंदर खेळी, इतर खेळाडूंमुळे शतकाची संधी हुकली, नेटकऱ्यांकडून संताप
वॉशिंग्टन सुंदर
Follow us on

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पेटीएम सीरिजमधील पहिली टेस्ट खेळण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडिया पहिल्या डावात सर्वबाद 337 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिषभ पंतने 91 तर त्यानंतर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 82 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने 300 चा टप्पा पार केला. तसेच इंग्लंडला 250 पेक्षा कमी धावांची आघाडी मिळाली. वॉशिंग्टनने केलेल्या या नाबाद खेळीमुळे त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. तसेच इतर फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे सुंदरची शतक करण्याची संधी हुकली. यामुळेही नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुंदरची शतकाची संधी हुकल्याने नेटीझन्सनी इतर फलंदाजांना फैलावर घेतलं आहे. (india vs england 2021 1st test day 4 netizens praised washington sundar for his 85 runs innings)

अश्विनसोबत 80 धावांची भागीदारी

रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा सेट जोडी बाद झाल्याने टीम इंडियाचा डाव पुन्हा अडखळला होता. मात्र यानंतर अश्विनसोबत सुंदरने डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अश्विन बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू एका मागोमाग एक बाद झाले. शेपटीच्या खेळाडूंनी त्याला चांगली साथ दिली असती तर सुंदरचे शतक पूर्ण झाले असते. पण जसप्रीत बुमराह बाद झाला आणि टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला. सुंदरने 138 चेंडूत 2 सिक्स आणि 12 चौकारांसह नाबाद 85 धावा केल्या.

 

 

परदेश आणि मायदेशात अर्धशतकी खेळी

सुंदरने या अर्धशतकासह आणखी एक अफलातून कामगिरी केली. सुंदरने त्याच्या कारकिर्दीमध्ये मायभूमीतील पहिल्याच कसोटीत अर्धशतक लगावले. तसेच पदार्पणातील सामन्यातही त्याने अर्धशतक लगावलं होतं. यासह तो परदेश आणि मायदेशातील पहिल्या सामन्यात अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधून पदार्पण

वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलिया विरोधातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केलं होतं. या पदार्पणतील सामन्यात त्याने शानदार कामगिरी करत रेकॉर्डही केला. तसेच टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने या चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने 3 विकेट्स घेतल्या. त्याने यासह ब्रिस्बेनवर तब्बल 19 वर्षानंतर 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. वॉशिंग्टनने 3 विकेट्स घेत इंग्लंडच्या एश्ले जाईल्सचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जाईल्सने 2002 मध्ये 101 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच सुंदरने दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.

संबंधित बातम्या :

Ajinkya Rahane | चौथ्या कसोटीत कुलदीपऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी का दिली, कॅप्टन रहाणे म्हणतो….

वॉश्गिंटन ‘सुंदर’च्या खेळीवर टीम इंडियाचे चाहते फिदा, मात्र ‘बापमाणूस’ नाराज…

(india vs england 2021 1st test day 4 netizens praised washington sundar for his 85 runs innings)