चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या एकूण 6 फलंदाजांना आऊट केलं. या कामगिरीसह अश्विनने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. (india vs england 2021 1st test day 4 ravichandran ashwin gets 6 wicketes and break Ian Botham record)
A bowling spell to cherish for @ashwinravi99 at his home ground.#INDvENG pic.twitter.com/1j9tmXmPYw
— BCCI (@BCCI) February 8, 2021
अश्विनने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या एकूण 6 फलंदाजांना बाद केलं. अश्विनने रॉरी बर्न्स, डोमिनिक सिबले, बेन स्टोक्स, डोम बेस, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनला बाद केलं. अश्विनने कसोटी कारकिर्दीत एकूण 28 वेळा 5 किवां त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. विशेष म्हणजे चेन्नईच्या या मैदानात अश्विनने 3 वेळा तर इंग्लंड विरुद्ध चौथ्यांदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. यासह अश्विन टेस्टमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेणारा 8 वा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने इयॉन बॉथमला पछाडत ही कामगिरी केली आहे. बॉथमने एकूण 27 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
अश्विन सर्वाधिक 5 वेळा विकेट्स घेणारा दुसराच सक्रिय गोलंदाज आहे. याबाबतीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन पहिल्या क्रमांकावर आहे. अँडरसनने 30 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड विरुद्धचा हा पहिला कसोटी सामना अश्विनच्या कारकिर्दीतील 75 वा सामना आहे. अश्विनने या एकूण सामन्यांमध्ये 386 विकेट्स मिळवल्या आहेत. यासोबत अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला (75 टेस्ट 383 विकेट्स) पछाडत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. अश्विन 75 सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा बोलर ठरला आहे.
Most wickets after 75 Test matches
420 – M Muralidharan
386 – R Ashwin
383 – Dale Steyn
378 – Richard Hadlee
358 – Glenn McGrath#IndvEng#IndvsEng#IndvsEng2021— Mohandas Menon (@mohanstatsman) February 8, 2021
420 – मुथैय्या मुरलीथरन
386 – आर अश्विन
383 – डेल स्टेन
378 – रिचर्ड हेडली
358 – ग्लेन मॅक्ग्रा
अश्विनने या सामन्यातील पहिल्या डावात आणखी एक विक्रम केला. पहिल्या डावात जेम्स अँडरसनला बाद करत त्याने हा बहुमान मिळवला. अश्विन आशियामध्ये 300 विकेट्स घेणारा एकूण पाचवा तर तिसरा भारतीय गोलंदाच ठरला. अश्विनने 51 सामन्यात 300 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
इंग्लडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने चौथ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या दिवशी आणखी 381 धावांची आवश्यकता असणार आहे. तर इंग्लंडला जिंकण्यासाठी 9 विकेट्स घ्यावे लागणार आहेत. यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
India vs England 1st Test | फिरकीपटू अश्विनची शानदार कामगिरी, ठरला तिसरा भारतीय गोलंदाज
India vs England 1st Test | रिषभ पंतसोबतच्या शतकी भागीदारामुळे चेतेश्वर पुजारा आनंदी, म्हणाला…..
(india vs england 2021 1st test day 4 ravichandran ashwin gets 6 wicketes and break Ian Botham record)