चेन्नई : इंग्लंडने टीम इंडियावर (India vs England 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताला केवळ 192 धावाच करता आल्या. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर कर्णधार विराट कोहली आणि शुबमन गिलचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर युवा फलंदाज शुबमन गिलने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर अनुभवी जेम्स अँडरसनने 3 फलंदाजांना बाद केलं. इंग्लंडने या विजयासह 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. (india vs england 2021 1st test day 5 live cricket score updates online in marathi at m a chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड
ENGLAND WIN ?
An all-round performance by the visitors has given them a 227-run victory over India.
The lead the four-test series 1-0!#INDvENG ➡️ https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/luS7HAcWIm
— ICC (@ICC) February 9, 2021
भारताला पहिल्या डावात 337 धावांवर गुंडाळल्याने इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडने या आघाडीसह दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. पण या डावात पाहुण्या इंग्रजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून भारतीय गोलंदाजांनी रोखले. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला या डावात 40 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 40 धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला सेकंड इनिंगमध्ये 178 धावांवर रोखले. यामुळे भारताला विजयासाठी 420 धावांचे तगडे आव्हान मिळाले. अश्विनने इंग्लंडच्या एकूण 6 फलंदाजांना बाद केलं. तर शाहबाज नदीमने 2 विकेट्स घेत अश्विनला चांगली साथ दिली.
टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 337 धावा केल्या. यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघा़डी मिळाली. पहिल्या डावात टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 73 धावा केल्या. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 85 धावांची खेळी केली. सुंदरला कोणत्याही फलंदाजाने साथ दिली नाही. यामुळे तो नाबाद राहिला. इंग्लंडकडून डोम बेसने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर आणि जॅक लीच या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने पहिल्या डावात कर्णधार जो रुटच्या द्विशतकाच्या जोरावर धावांचा डोंगर रचला. इंग्लंडने सर्वबाद 578 धावा केल्या. रुटने 377 चेंडूत 19 फोर आणि 2 सिक्ससह 218 शानदार धावा केल्या. डोमिनिक सिबलेने 87 तर बेन स्टोक्सने 82 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर इशांत शर्मा आणि नदीम शाहबाजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने भारतावर पहिल्या कसोटीत 227 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
इंग्लंडचा कर्णधर जो रुटसाठी हा सामना खास ठरला. त्याने आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात शानदार द्विशतक लगावलं.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 227 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताला केवळ 192 धावाच करता आल्या. या विजयासह इंग्लंडने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारताने नववी विकेट गमावली आहे. शाहबाज नदीम शून्यावर बाद झाला आहे.
टीम इंडियाला आठवा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली 72 धावांची खेळी केली
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विन 9 धावा करुन माघारी परतला आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक 34 वरील आजोप्लास्ट या रासायनिक कारखान्याला दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली असून, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. शेजारील कारखान्यांना देखील धग पोहोचली.
कर्णधार विराट कोहलीने झुंजार अर्धशतक लगावलं आहे. पाचव्या दिवसातील दुसऱ्या सत्राता खेळ सुरु आहे. अश्विन आणि विराट मैदानात खेळत आहेत. या जोडीकडून टीम इंडियाला आणि भारतीय समर्थकांना आशा आहेत.
अश्विनने सामन्याच्या 41 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अँडरसनच्या बोलिंगवर शानदार फोर लगावला.
पाचव्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि अश्विन मैदानात खेळत आहेत. या जोडीकडून टीम इंडिया फार अपेक्षा आहेत.
पहिल्या कसोटीतील पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रातील खेळ संपला आहे. सत्राअखेर भारताचा 6 बाद 144 असा स्कोअर झाला आहे. या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या टॉपच्या 5 फलंदाजांनी शरणागती पत्कारली.
इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली आहे. टीम इंडियाने सहा विकेट्स गमावल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात भारताला सहावा धक्का बसला आहे. यामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे.
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. रिषभ पंत आऊट झाला आहे. यामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे.
टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. रिषभ पंत- विराट कोहली मैदानात खेळत आहेत.
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. उप कर्णधार अजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकला नाही. रहाणे बाद झाल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. अर्धशतक लगावलेला शुबमन गिल बोल्ड झाला आहे. जेम्स अँडरसनने त्याला आऊट केलं आहे. शुबमनने 83 बोलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्ससह 50 धावा केल्या.
शुबमन गिलने 81 चेंडूमध्ये शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं आहे.
टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टेस्ट स्पेशालिस्ट आणि टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजारा आऊट झाला आहे.
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल मैदानात खेळत आहेत.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटीतील पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात खेळत आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. चौथ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या. त्यामुळे आज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 381 धांवाची आवश्यकता आहे.
चेन्नई कसोटीचा आजचा (9 फेब्रुवारी) पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी एकूण 420 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने चौथ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या. यामुळे भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 381 धावांची आवश्यकता आहे.