चेन्नई : इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या कसोटी (India vs England 1st Test) सामन्यामध्ये 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाचा दुसरा डाव 191 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 72 धावा केल्या. तर सलामीवीर शुबमन गिलने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 3 तर जॅक लीच 4 विकेट्स घेतल्या. या विजयाह इंग्लंडने या मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. तर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. या निमित्ताने भारताच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं पाहणार आहोत. (india vs england 2021 1st test day 5 team india 5 big reason for chennai test match lost)
भारतीय संघाच्या पराभवाच्या महत्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे अपयशी सलामी जोडी. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने दोन्ही डावांमध्ये निराशा केली. या दोघांनी पहिल्या डावात 19 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 25 धावा जोडल्या. युवा शुबमनला दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. गिलने पहिल्या डावात 29 तर दुसऱ्या डावात 50 धावा केल्या. तर हिटमॅन रोहित दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. रोहितने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 6 आणि 12 धावा केल्या.
भारताच्या पराभवाचं आणखी एक मोठं कारण ठरलं ते पार्टनरशीप. टीम इंडियाला दोन्ही डावात अपवाद वगळता मोठी भागीदारी रचता आली नाही. दुसऱ्या डावात 7 व्या विकेटसाठी एकमेव अर्धशतकी भागीदारी झाली. अश्विन आणि विराट कोहली या जोडीने ही भागीदारी केली. तर पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या जोडीने 5 व्या विकेटसाठी 119 धावा जोडल्या. या 2 पार्टनरशीप व्यतिरिक्त कोणत्याही जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही.
टीम इंडियाचा उपकर्णधार असलेला अजिंक्य रहाणेने भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. रहाणेला या सामन्यात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. रहाणे पहिल्या डावात अवघ्या 1 धावेवर आऊट झाला. तर दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. रहाणेकडून दुसऱ्या डावात मोठ्या आणि जबाबदार खेळीची अपेक्षा होती. पण त्यांनी सपशेल निराशा केली.
पहिल्या डावात टीम इंडियाची सेट जोडी बाद झाल्यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने किल्ला लढवला. मात्र त्याला शेपटीच्या फलंदाजांना योग्य साथ देता आला नाही. टॅलेंडर्सने सुंदरला चांगली साथ न दिल्याने इंग्लंडला दुसऱ्या डावात 200 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळाली. भारताचा पहिला डाव 337 धावांवर आटोपल्याने वॉशिग्टंने सुंदर 85 धावांवर नाबाद राहिला.
भारतीय गोलंदाज इंग्लंड विरुद्ध गोलंदाजी करताना पहिल्या डावात विकेट्स घेण्यास अपयशी ठरले. पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जो रुट, डॉम सिबले आणि बेन्स स्टोक्सने जोरदार फटकेबाजी करत अनुक्रमे वैयक्तिक द्विशतक आणि अर्धशतक लगावले. या तिघांना रोखण्यात अपयशी ठरल्याने इंग्ंलडने पहिल्या डावात 578 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
Rishabh Pant | टीम इंडियाचा रिषभ पंत ठरला ICC Men’s Player of the Month पुरस्कराचा मानकरी
(india vs england 2021 1st test day 5 team india 5 big reason for chennai test match lost)