चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यामधील (India vs England 2nd Test) आजचा (15 फेब्रुवारी) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारत दुसर्या कसोटीत जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला विजयासाठी आणखी 7 विकेट्सची आवश्यकता आहे. इंग्लंडसमोर भारताने 482 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने दुसर्या डावात 53 धावा देऊन 3 गडी गमावले आहेत. तिसर्या दिवशी अश्विनने इंग्लंडच्या दुसर्या डावात एक विकेट घेतला तर अक्षर पटेलने 2 बळी घेतले. कर्णधार जो रूट आणि लॉरेन्स नाबाद असून चौथ्या दिवशी हे दोघेही आपल्या टीमसाठी झगडताना दिसतील. तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. अश्विनने भारताकडून शतक झळकावताना सर्वाधिक 106 धावा केल्या. (india vs england 2021 2nd test day 3 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड
अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना धमाकेदार शतक पूर्ण केलं. अश्विनने मोईन अलीच्या बोलिंगवर फोर ठोकत 134 चेंडूत हे शतक पूर्ण केलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनच्या शतकी खेळीमुळे भारताला दुसऱ्या डावात 286 धावा करता आल्या.
टीम इंडियाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या. भारताकडे असलेल्या 195 धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले आहे.
टीम इंडियाला विजयासाठी आणखी 7 विकेट्सची गरज आहे. भारताने इंग्लंडसमोर 482 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने दुसर्या डावात 53 धावा करुन 3 विकेट्स गमावल्या आहेत. तिसर्या दिवशी अश्विनने इंग्लंडच्या दुसर्या डावात एक विकेट घेतला तर अक्षर पटेलने 2 बळी घेतले. कर्णधार जो रूट आणि लॉरेन्स नाबाद आहेत.
अक्षर पटेलने इंग्लंडला तिसरा दणका दिला आहे. अक्षरने जॅक लीचला शून्यावर आऊट केलं आहे. यामुळे इंग्लंडची 50-3 अशी स्थिती झाली आहे.
इंग्लंडने दुसरी विकेट गमावली आहे. अश्विनने रोरी बर्न्सला विराट कोहलीच्या हाती 25 धावांवर आऊट केलं.
फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडला पहिला झटका दिला आहे. अक्षर पटेलने डोमिनिक सिबलेला एलबीडबल्यू आऊट केलं.
इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले आहे.
चेन्नई कसोटीत भारताच्या शेवटच्या क्रमांकावरील फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलंच जेरीस आणलं. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने शतक ठोकल्यानंतर अश्विन आणि मोहम्मद सिराज या जोडीने दहाव्या विकेटसाठी 49 भागीदारी रचली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात 286 धावा करत आल्या. भारताने आता इंग्लंडसमोर 482 धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे.
शतक साजरं केल्यानंतर रवीचंद्रन अश्विन फार वेळ मैदानात टीकू शकला नाही. 106 धावांवर असताना ओली स्टोनच्या गोलंदाजीवर अश्विन त्रिफळाचित झाला. भारताने दुसऱ्या डावात 286 धावा करत इंग्लंडसमोर 481 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
भारताने नववी विकेट गमावली आहे. इशांत शर्मा 7 धावांवर आऊट झाला आहे.
तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राला सुरुवात झाली आहे. अश्विन आणि इशांत शर्मा मैदानात खेळत आहेत. अश्विनची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
टीम इंडियाने तिसऱ्या दिवसातील टी ब्रेकपर्यंत 73 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 221 धावा केल्या आहेत. यासह भारताने 416 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. अश्विन 68 तर इशांत शर्मा शून्यावर खेळत आहे.
टीम इंडियाला आठवा धक्का लागला आहे. कुलदीप यादव 3 धावांवर आऊट झाला आहे. दरम्यान टीम इंडियाकडे 405 धावांची आघाडी आहे.
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. विराट कोहली 62 धावांवर आऊट झाला. मोईन अलीने विराटला एलबीडबल्यू आऊट केलं.
टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. यासह भारताने दुसऱ्या डावात 395 धावांची आघाडी घेतली आहे.
अश्विनने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट आणि अश्विन या दोघांनी सातव्या विकेटसाठी 80 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
कॅप्टन विराट कोहलीने झुंजार अर्धशतक लगावलं आहे. विराटच्या या अर्धशतकामुळे टीम इंडियाचा डाव सावरला आहे. दरम्यान अश्विन आणि विराट मैदानात खेळत आहेत.
FIFTY!
A well made half-century for #TeamIndia Captain @imVkohli ??
Live – https://t.co/Hr7Zk2kjNC #INDvENG @Paytm pic.twitter.com/WvV2e5h9hn
— BCCI (@BCCI) February 15, 2021
दुसऱ्या सत्राताील खेळाला सुरुवात झाली आहे. अश्विन आणि विराट मैदानात खेळत आहेत. या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे. दोघांमध्ये 60 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. तसेच टीम इंडियाकडे 350 पेक्षाही अधिक रन्सची आघाडी आहे.
दुसऱ्या डावात टीम इंडियाची बिकट अवस्था झाली आहे. लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाने 6 गडी गमावले असून, 156 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार विराट कोहली 38 तर रवीचंद्रन अश्विन 34 धावांवर खेळत आहेत.
टीम इंडियाने 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. कॅप्टन कोहलीने चौकार खेचत 300 धावांचा टप्पा पूर्ण केला.
भारताने दुसऱ्या डावात एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या आहेत. अक्षर पटेल आऊट झाला आहे. यामुळे भारताची 106-6 अशी स्थिती झाली आहे.
टीम इंडियाने पाचवी विकेट्स गमावली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आऊट झाला आहे. रहाणे 10 धावा करुन तंबूत परतला आहे.
टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत. पुजारा, रोहितनंतर रिषभ पंत आऊट झाला आहे. यामुळे भारताची 65-4 अशी स्थिती झाली आहे.
हिटमॅन रोहित शर्मा 26 धावांवर स्टंपिग आऊट झाला. विकेटकीपर बेन फोक्सने जॅक लीचच्या बोलिंगवर स्टंपिंग आऊट केलं.
टीम इंडियाची तिसऱ्या दिवसाची वाईट सुरुवात झाली आहे. चेतेश्वर पुजारा 7 धावांवर रनआऊट झाला आहे. यामुळे भारताचा 2 बाद 55 अशी स्थिती झाली आहे. पुजारा बाद झाल्यानंतर कॅप्टन विराट कोहली मैदानात आला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 250 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने 54-1 या धावसंख्येपासून बॅटिंगला सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवस आहे. भारताने दुसऱ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 54 धावा केल्या. भारताने यासह 249 धावांची आघाडी घेतली आहे.