चेन्नई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अशी ओळख मिळवलेल्या आर अश्विन (R Ashwin) घरच्या मैदानात धमाका केला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत (India vs England 2nd Test) खणखणीत शतक ठोकलं. ज्या मैदानात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे जम बसवू शकले नाहीत, त्याच चेपॉकच्या मैदानाचा बादशाह, आपणच असल्याचं अश्विनने आज दाखवून दिलं. पहिल्या डावात इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडल्यानंतर, आज फलंदाजीसाठी आलेल्या अश्विनने 134 चेंडूत शतक झळकावलं. अश्विनने आज जवळपास तीन तासात हे शतक पूर्ण केलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. आधी विराट कोहलीच्या साथीने त्याने अर्धशतक झळकावलं, त्यानंतर तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन, अश्विन इंग्लंडच्या खेळाडूंना चांगलाच भिडला. (india vs england 2021 2nd test day 3 R Ashwin hit century in 134 balls )
A 5-wicket haul followed by an excellent ? for the 3rd time in a Test!
The magnificent @ashwinravi99 has brought up his 5th Test century and his first in Chennai. What a game is the local hero having. ??? #TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/dUni7KkLYc
— BCCI (@BCCI) February 15, 2021
टीम इंडियाने दुसऱ्या डावात झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताची 106-6 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि अश्विनने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी आश्वासक भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतक पूर्ण केलं. सातव्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारीच्या दिशेने आगेकूच केली. पण ही सेट जोडी फोडून काढण्यास मोईन अलीला यश आले. अलीने विराटला 62 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे या दोघांमध्ये शतकी भागीदारी होता होता राहिली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 96 धावा जोडल्या.
अश्विनच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 286 धावा केल्या. टीम इंडियाकडे 195 धावांची आघाडी होती. यामुळे टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
संबंधित बातम्या :
(india vs england 2021 2nd test day 3 R Ashwin hit century in 134 balls )