चेन्नई : टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी (india vs england 2021 2nd test day 4) सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. (india vs england 2021 2nd test day 4 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड
अक्षर पटेलचं अविस्मरणीय पदार्पण ठरलं. पटेलने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. अक्षर पदार्पणात 5 विकेट्स घेणारा 9 वा भारतीय ठरला.
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटीत 317 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारने गौरवण्यात आलं.
टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या.
इंग्लंडला आठवा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने कॅप्टन जो रुटला आऊट केलं आहे. यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 2 विकेट्सची आवश्यकता आहे.
दुसर्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रातील खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडने 116 धावा देऊन 7 विकेट्स गमावले आहेत. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने 4 विकेट्स गमावले. इंग्लंडवर विजय मिळवण्यासाठी भारताला आणखी 3 बळींची आवश्यकता आहे.
इंग्लंडंचा कर्णधार जो रुटला जीवनदान मिळालं आहे. सामन्याच्या 47 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने रुटचा सोपा कॅच सोडला.
अक्षर पटेलने इंग्लंडला सहावा धक्का दिला आहे. अक्षरने ओली पोपला आऊट केलं आहे. यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 4 विकेट्सची आवश्यकता आहे. दरम्यान बेन फोक्स आणि जो रुट मैदानात खेळत आहेत.
इंग्लंडने पाचवी विकेट गमावली आहे. अश्विनने बेन स्टोक्सला आऊट केलं आहे. स्टोक्सला आऊट करण्याची अश्विनची ही 10 वी वेळ ठरली.
टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. गिलला दुसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना डाव्या हाताला दुखापत झाली. त्याचं स्कॅन करण्यात आलं आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने केलेलं ट्विट
UPDATE – Shubman Gill sustained a blow on his left forearm while fielding on Day 3 of the 2nd Test. He has been taken for a precautionary scan. The BCCI Medical Team is assessing him. He won't be fielding today.#INDvENG pic.twitter.com/ph0GJsqpFi
— BCCI (@BCCI) February 16, 2021
अश्विनने चौथ्या दिवसातील सामन्यातील 26 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर चौथा धक्का दिला आहे. अश्विनच्या बोलिंगवर विकेटकीपर रिषभ पंतने डेनियल लॉरेन्स स्टंपिग आऊट केलं. लॉरेन्सने 26 धावा केल्या. लॉरेन्स बाद झाल्याने इंग्लंडची 66-4 अशी स्थिती झाली आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून डॅनियल लॉरेन्स आणि कॅप्टन जो रुट खेळत आहेत.
दुसऱ्या कसोटीतील आजचा चौथा दिवस आहे. इंग्लंड चौथ्या दिवसाच्या खेळाला 53-3 धावसंख्येवरुन सुरुवात करणार आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी 429 धावांची आवश्यकता आहे. तर टीम इंडियाला अवघ्या 7 विकेट्सची गरज आहे.