India vs England 3rd Test 2nd Day Highlights | जगातील मोठ्या स्टेडियममध्ये टीम इंडियाचा मोठा विजय, इंग्लंडवर 10 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

| Updated on: Feb 25, 2021 | 10:50 PM

टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत पराभूत करत 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

India vs England 3rd Test 2nd Day Highlights | जगातील मोठ्या स्टेडियममध्ये टीम इंडियाचा मोठा विजय, इंग्लंडवर 10 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी
टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत पराभूत करत 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीच इंग्लंड वर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाच्या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. रोहित शर्माने नाबाद 25 तर शुबमन गिलने नाबाद 15 धावा केल्या. (india vs england 2021 3rd test day 2 live cricket score updates online in marathi at narendra modi cricket stadium ahmedabad)

फिरकी गोलंदाजांची कमाल, सामना दुसऱ्या दिवशी निकाली

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांची चलती पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी दोन्ही डावात मिळून मिळून 20 पैकी 19 विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. तर एकमेव विकेट ही वेगवान गोलंदाजाच्या खात्यात गेली.

लोकल बॉय अक्षर पटेलने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून एकूण 7 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि इशांत शर्माला 1 विकेट मिळाली.

 

 

Key Events

इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय

टीम इंडियाने इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 49 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीनेच पूर्ण केलं.या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

अक्षर पटेलचा जलवा, दुसऱ्या कसोटीत एकूण 11 विकेट्स

लोकल बॉय अक्षर पटेलने आपल्या फिरकीवर पाहुण्या इंग्लंडला नाचवलं आहे. अक्षरने या सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Feb 2021 08:23 PM (IST)

    लोकल बॉय अक्षर पटेल ठरला ‘मॅन ऑफ द मॅच’

    लोकल बॉय अक्षर पटेल सामनावीर ठरला आहे. अक्षर पटेलने या तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावात मिळून एकूण 11 विकेट्स घेतल्या. अक्षरने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं होतं. या सामन्यातील दुसऱ्या डावात ते या  तिसऱ्या कसोटीतील पहिल्या आणि दुसऱ्या डावात त्याने प्रत्येकी 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

  • 25 Feb 2021 08:12 PM (IST)

    इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर

    टीम इंडियाने इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत 10 विकेट्ने पराभव केला. यामुळे इंग्लंडचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याचं स्वप्न भगंल आहे. दरम्यान न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत आधीच धडक मारली आहे.


  • 25 Feb 2021 08:00 PM (IST)

    षटकार खेचत टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

    रोहित शर्माने षटकार खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

  • 25 Feb 2021 07:40 PM (IST)

    चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शुबमनचा जोरदार षटकार

    सलामीवीर शुबमन गिलने चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जोरदार सिक्स खेचला आहे. यामुळे टीम इंडिया विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.

  • 25 Feb 2021 07:36 PM (IST)

    चौकाराने तिसऱ्या सत्राला सुरुवात

    तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. शुबमन गिलने चौकारासह तिसऱ्या सत्राचा प्रारंभ केला आहे. यामुळे टीम इंडिया विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.

  • 25 Feb 2021 06:56 PM (IST)

    दुसऱ्या सत्रापर्यंत भारताच्या बिनबाद 11 धावा

    भारताने दुसऱ्या सत्रापर्यंत बिनबाद 11 धावा केल्या  आहेत. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 38 धावांची आवश्यकता आहे.

  • 25 Feb 2021 06:48 PM (IST)

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 49 धावांचे आव्हान

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान मिळाले आहे. मैदानात रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी खेळत आहे.

  • 25 Feb 2021 06:44 PM (IST)

    टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांचे आव्हान

    टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात अवघ्या 81 धावांवर गुंडाळले आहे. भारताकडे 33 धावांची आघाडी होती.  यामुळे टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान मिळाले आहे.

  • 25 Feb 2021 06:13 PM (IST)

    इंग्लंडला सातवा धक्का, अश्विनच्या कसोटीतील 400 विकेट्स पूर्ण

    इंग्लंडने सातवी विकेट गमावली आहे. अश्विनने जोफ्रा आर्चरला आऊट केलं. यासह अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे.

  • 25 Feb 2021 06:03 PM (IST)

    इंग्लंडला सहावा धक्का, ओली पोप आऊट

    अश्विनने इंग्लंडला सहावा झटका दिला आहे. अश्विनने ओली पोपला 12 धावांवर आऊट केलं.

  • 25 Feb 2021 05:55 PM (IST)

    इंग्लंडला पाचवा धक्का, अक्षर पटेलच्या सामन्यात 10 विकेट्स

    लोकल बॉय अक्षर पटेलने इंग्लंडला पाचवा धक्का दिला आहे. अक्षरने जो रुटला आऊट केलं आहे. यासह रुटने या सामन्यात दोन्ही डावात मिळून  10 विकेट्स घेतल्या आहेत.

  • 25 Feb 2021 05:50 PM (IST)

    इंग्लंडला चौथा धक्का

    आर अश्विनने इंग्लंडला चौथा झटका दिला आहे. अश्विनने बेन स्टोक्सला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. स्टोक्सने 34 चेंडूत 3 चौकारांसह 25 धावा केल्या. अश्विनने कसोटीमध्ये बेन स्टोक्सला आऊट करण्याची 11 वेळ ठरली.

  • 25 Feb 2021 05:27 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा धक्का

    अक्षर पटेलने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. अक्षरने  डोमिनिक सिबलेला 7 धावांवर विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 25 Feb 2021 04:38 PM (IST)

    इंग्लंडला दुसरा धक्का

    अक्षर पटेलने इंग्लंडला दुसऱ्या डावातील बॅटिंगदरम्यान पहिल्याच ओव्हरमध्ये दुसरा धक्का दिला आहे. अक्षरने आधी जॅक क्रॉलीला आऊट केलं. यानंतर आता जॉनी बेयरस्टोला बोल्ड केलं.

  • 25 Feb 2021 04:34 PM (IST)

    इंग्लंडला पहिल्याच चेंडूवर धक्का

    लोकल बॉय अक्षर पटेलने इंग्लंडला पहिल्या चेंडूवर धक्का दिला आहे. त्याने जॅक क्रॉलीला बाद केलं आहे.

  • 25 Feb 2021 04:20 PM (IST)

    टीम इंडियाच्या पहिल्या डावात 145 धावा

    टीम इंडियाने पहिल्या डावात 145 धावा केल्या आहेत. यासह भारताने  33  धावांची आघाडी मिळवली आहे.  भारताने अखेरच्या 7  विकेट्स अवघ्या 46 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. टीम इंडियाने 99-3 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र यानंतर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना माघारी पाठवलं. कर्णधार जो रुटने इंग्लंडकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर जॅक लीचने 4  फलंदाजांना माघारी पाठवत  रुटला चांगली साथ दिली.

  • 25 Feb 2021 03:57 PM (IST)

    51 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इशांतचा शर्माचा शानदार सिक्स

    इशांत शर्माने जॅक लीचच्या बोलिंगवर शानदार सिक्स खेचला.

  • 25 Feb 2021 03:54 PM (IST)

    भारताला नववा धक्का

    भारताने नववी विकेट गमावली आहे. अश्विन 17 धावांवर बाद झाला आहे.

  • 25 Feb 2021 03:34 PM (IST)

    भारताला आठवा धक्का

    भारताने आठवी विकेट गमावली आहे. सुंदरनंतर लोकल बॉय अक्षर पटेलही शून्यावर माघारी परतला आहे. यामुळे भारताची 125-8 अशी स्थिती झाली आहे.

  • 25 Feb 2021 03:29 PM (IST)

    भारताला सातवा धक्का, वॉशिंग्टन सुंदर भोपळा न फोडता माघारी

    इंग्लंडच्या फिरकी आक्रमणासमोर भारतीय गोलंदाजांनी शरणागती पत्कारली आहे. भारताने वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात सातवी विकेट गमावली आहे. कर्णधार जो रुटने वॉशिंग्टन सुंदरला शून्यावर आऊट केलं आहे. यामुळे भारताची  125-7 अशी नाजूक स्थिती झाली आहे.

  • 25 Feb 2021 03:16 PM (IST)

    भारताला सहावा धक्का, रिषभ पंत आऊट

    भारताने सहावी विकेट गमावली आहे. रिषभ पंत जो रुटच्या गोलंदाजीवर कॅच आऊट झाला आहे. पंत 1 धावा करुन माघाऱी परतला आहे. यामुळे भारताची  117-6 अशी धावसंख्या झाली आहे.

  • 25 Feb 2021 03:11 PM (IST)

    भारताचा अर्धा संघ तंबूत

    टीम इंडियाने रोहित शर्माच्या रुपात पाचवी विकेट गमावली आहे. रोहितला जॅक लीच एलबीडब्लयू आऊट केलं आहे. रोहितने 96 चेंडूंमध्ये 11 फोरसह 66 धावा केल्या.

  • 25 Feb 2021 02:55 PM (IST)

    भारताला चौथा धक्का

    टीम इंडियाला चौथा धक्का बसला आहे. उप कर्णधार अजिंक्य रहाणे 7 धावांवर एलबीडबल्यू आऊट झाला आहे. अजिंक्यला इंग्लंडच्या जॅक लीचने बाद केलं आहे. यामुळे भारताची 114-4 अशी धावसंख्या झाली आहे.

  • 25 Feb 2021 02:49 PM (IST)

    टीम इंडिया आघाडीवर

    टीम इंडियाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 112 धावा केल्या. 113 धाव घेताच भारताने आघाडी मिळवली आहे.

  • 25 Feb 2021 02:47 PM (IST)

    अजिंक्य रहाणेचा चौकार

    अजिंक्य रहाणेने जॅक लीचच्या गोलंदाजीवर पॅडल स्वीप मारत चेंडू सीमारेषाच्या बाहेर पाठवला.

  • 25 Feb 2021 02:40 PM (IST)

    दिवसाचा पहिला चौकार रोहितच्या बॅटने

    रोहित शर्माने दुसऱ्या दिवसातील पहिला चौकार लगावला आहे. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रोहितने शानदार चौकार लगावला. यासह रोहितने 60 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

  • 25 Feb 2021 02:36 PM (IST)

    रोहितच्या 50+ धावा म्हणजे शतकाची हमी

    रोहित शर्माने पहिल्या दिवसखेर 57 धावा केल्या. त्यामुळे रोहित या अर्धशतकाचे नक्कीच शतकात रुपांतर करणार. असं आम्ही नाही तर त्याची आकडेवारी म्हणत आहे. रोहितनचा कनव्हर्जन रेट हा 80 टक्के इतका आहे. रोहितने मागील 5 डावांमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. त्या अर्धशतकांचं 4 वेळा शतकात रुपांतर केलं आहे. त्यामुळे रोहितकडून भारतीय चाहत्यांना शतक अपेक्षित असणार आहे.

  • 25 Feb 2021 02:32 PM (IST)

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

    रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आहे. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने दिवसातील पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 25 Feb 2021 02:18 PM (IST)

    टीम इंडिया 100-125 धावांची आघाडी घेणार : सुनील गावसकर

    टीम इंडिया पहिल्या डावात 100 ते 125 धावांची आघाडी घेईल, असा अंदाज लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे. पिच रिपोर्ट दरम्यान त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

  • 25 Feb 2021 02:16 PM (IST)

    टीम इंडिया सज्ज

    दुसऱ्या दिवसाच्या खेळासाठी टीम इंडिया सज्ज आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडिया या कसोटीच्या दृष्टीने आखताना दिसत आहे.

     

  • 25 Feb 2021 02:14 PM (IST)

    थोड्याच वेळात दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

    अवघ्या काही मिनिटांमध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. भारताने पहिल्या दिवसखेर  3 विकेट्स गमावून 99 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे ही जोडी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करणार आहे. भारताला आघाडी घेण्यासाठी आता फक्त 13 धावांची आवश्यकता आहे.