अहमदाबाद : टीम इंडियाने शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या चौथ्या टी 20 सामन्यात (India vs England 2021 4th T20) इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर जेसन रॉयने 40 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकरूने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ही जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. (India vs England 2021 4th T20 suryakumar yadav scored 57 runs and shardul thakur gets 3 wickets)
M.O.O.D!??
An 8⃣-run win in the 4th @Paytm #INDvENG T20I & #TeamIndia level the series 2-2! ??@Paytm #INDvENG
Scorecard ? https://t.co/TYCBHIV89r pic.twitter.com/XGUimbNa6c
— BCCI (@BCCI) March 18, 2021
शार्दुलने या सामन्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 4 ओव्हरमध्ये एकूण 42 धावा दिल्या. यामध्ये त्याने बेन स्टोक्स, इयोन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन या तिघांना बाद केलं. विशेष म्हणजे शार्दुलने निर्णायक वेळी स्टोक्स आणि मॉर्गनला सलग बाद केलं. शार्दुलच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केलं. तसेच शार्दुलने बॅटिंग करताना 4 चेंडूत 2 चौकारांसह महत्वपूर्ण 10 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना शानदार अर्धशतकी खेळी केली. सुर्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची अफलातून खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली.
A 28-ball 5⃣0⃣ for @surya_14kumar! ??
First outing with the bat in international cricket & he is making it count. ?? @Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match ? https://t.co/TYCBHIV89r pic.twitter.com/nQ6I9fNCoD
— BCCI (@BCCI) March 18, 2021
टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
(India vs England 2021 4th T20 suryakumar yadav scored 57 runs and shardul thakur gets 3 wickets)