India vs England 4th Test, Day 2 Live Updates | रिषभ पंतचे खणखणीत शतक, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडे 89 धावांची आघाडी

| Updated on: Mar 05, 2021 | 5:49 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा (india vs england 2021 4th test) आजच्या (5 मार्च) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.

India vs England 4th Test, Day 2 Live Updates | रिषभ पंतचे खणखणीत शतक, वॉशिंग्टनची सुंदर खेळी, दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडे 89 धावांची आघाडी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा आजचा (5 मार्च) दुसरा दिवस आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील (India vs England 4th Test) दुसऱ्या दिवसाचा  खेळ संपला आहे.अहमदाबादमधील चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी भारताने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 294 धावा केल्या. यासह पहिल्या डावात भारताला 89 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. रिषभ पंतने 101 धावांची शतकी खेळी केली. त्या व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरनेही नाबाद 60 केल्या आहेत. या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडिया 300 धावांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. दुसऱ्या दिवसखेर सुंदर आणि अक्षर पटेल नाबाद आहेत. तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. तसेच सुंदरलाही शतक पूर्ण करण्याची संधी आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.  (india vs england 2021 4th test day 2 live cricket score updates online in marathi at narendra modi cricket stadium ahmedabad)

Key Events

पंत-सुंदरची निर्णायक भागीदारी

रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागादीर केली. या दोघांमध्ये 7 व्या विकेटसाठी 158 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी टर्निंग पाईंट ठरला. या दरम्या पंतने आपलं शतक पूर्ण केलं. रिषभच्या कारकिर्दीतील हे तिसरं तर भारतातील पहिलं शतक ठरलं.

इंग्लंडच्या पहिल्या डावात 205 धावा

टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. तसेच मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 05 Mar 2021 05:46 PM (IST)

    दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त

    दुसर्‍या दिवसाअखेरीस टीम इंडियाने  7 विकेट गमावून 294 धावा केल्या आहेत. यासह पहिल्या डावात भारताला 89 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवसखेर वॉशिंग्टन सुंदर (60*) आणि अक्षर पटेल (11*)  धावांवर नाबाद आहेत.  दुसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 101 धावांची शतकी केली. पंतच्या या खेळीच्या जोरावर भारताने ही महत्वपूर्ण आघाडी घेतली.  तिसऱ्या दिवशी  मोठी आघाडी घेण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. तसेच सुंदरलाही शतक पूर्ण करण्याची संधी आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

  • 05 Mar 2021 04:43 PM (IST)

    वॉशिंग्टनचे ‘सुंदर’ अर्धशतक

    वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक पूर्ण केलं आहे. रिषभ शतक पूर्ण झाल्यानंतर बाद झाला. त्यानंतर सुंदने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. सुंदरच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं.  यासह टीम इंडियाने 70 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली.


  • 05 Mar 2021 04:38 PM (IST)

    शतकी खेळीनंतर रिषभ पंत आऊट

    खणखणीत शतक ठोकल्यानंतर रिषभ पंत आऊट झाला आहे. पंतने आपल्या खेळीत 118 चेंडूत  13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावांची खेळी केली.

  • 05 Mar 2021 04:18 PM (IST)

    सिक्सरसह पंतचे शानदार शतक

    सिक्सरसह रिषभ पंतने शानदार शतक पूर्ण केलं आहे.  पंतने 115 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केलं आहे. पंतचं  कसोटीमधील हे तिसरं शतक ठरलं आहे.

  • 05 Mar 2021 04:14 PM (IST)

    पंत-सुंदरची शतकी भागीदारी

    रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या भागीदारीने टीम इंडियाचा डाव सावरला. या दरम्यान पंतने आपले अर्धशतक पूर्ण केलं. पंत सध्या शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर सुंदरही अर्धशतकाच्या जवळ आहे.

  • 05 Mar 2021 03:42 PM (IST)

    पंतचे सलग 2 चौकार, टीम इंडिया 200 पार

    रिषभ पंतने बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर सलग 2 चौकार खेचले. यासह टीम इंडियाने इंग्लंडच्या 205 धावांची बरोबरी केली आहे.

  • 05 Mar 2021 03:34 PM (IST)

    रिषभ पंत-वॉशिंग्टन सुंदरची सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. या जोडीने सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.  टीम इंडियाने 146 धांवावर  6 वी विकेट गमावली होती. त्यानंतर या जोडीने धावफलक हलता ठेवला. या दरम्यान रिषभ पंतने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

  • 05 Mar 2021 03:21 PM (IST)

    पंतचे अर्धशतक पूर्ण

    रिषभ पंतने निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी केली आहे. रिषभच्या कसोटी कारकिर्दीतील हे 7 वं अर्धशतक ठरलं. रिषभने सुंदरसोबत टीम इंडियाचा डावही सावरला. तसेच त्याने या अर्धशतकादरम्यान काही शानदार फटकेही लगावले. पंत गेल्या काही काळापासून सातत्याने चांगली खेळी करत आहे.

     

  • 05 Mar 2021 02:48 PM (IST)

    तिसऱ्या सत्राला सुरुवात

    दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राला सुरुवात झाली आहे. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर नाबाद खेळत आहेत.

  • 05 Mar 2021 02:23 PM (IST)

    दुसऱ्या सत्राचा खेळ संपला

    दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सत्रापर्यंत 6 विकेट्स गमावून 153 धावा केल्या आहेत. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात नाबाद आहेत. टीम इंडिया अजूनही 52 धावांनी पिछाडीवर आहे.

  • 05 Mar 2021 02:02 PM (IST)

    भारताला सहावा धक्का

    भारताने सहावी विकेट गमावली आहे. अश्विन आऊट झाला आहे. अश्विनने 2 चौकारांसह 13 धावांची खेळी केली.

  • 05 Mar 2021 01:54 PM (IST)

    पंत-अश्विनची झुंज

    टीम इंडियाने पाच विकेट गमावल्यानंतर रिषभ पंत आणि आर अश्विनने भारताचा डाव सावरला आहे. पंत आणि अश्विन संघर्ष करत आहेत.

  • 05 Mar 2021 01:14 PM (IST)

    रोहित शर्मान 49 धावांवर आऊट, भारताचा अर्धा संघ तंबूत

    रोहित शर्माने 49 धावांवर बाद झाला  आहे. बेन स्टोक्सने  रोहितला एलबीडबल्यू आऊट केलं आहे.  अर्धशतकाच्या उंबरठ्यावर  असताना एक धावेसाठी रोहितला फार संघर्ष करावा लागला. पण स्टोक्सने रोहितला अर्धशतकापासून रोखंल. यासह भारताला रोहितच्या रुपात 5 वा धक्का बसला.  रोहितने  144 चेंडूत 7 चौकारांसह 49 धावांची खेळी केली.

  • 05 Mar 2021 01:04 PM (IST)

    पंतचा उत्तुंग षटकार

    रिषभ पंतने जो रुटच्या बोलिंगवर उत्तुंग षटकार खेचला आहे. यासह पंत 20 धावांवर पोहचला आहे.

  • 05 Mar 2021 12:49 PM (IST)

    चौकारसह टीम इंडियाच्या 100 धावा

    टीम इंडियाने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 4 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा आणि रिषभ पंत मैदानात खेळत आहेत.

  • 05 Mar 2021 12:25 PM (IST)

    चौकारासह दुसऱ्या सत्राला सुरुवात

    चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसातील दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. या सत्राची सुरुवात चौकारासह झाली.  रोहितने चौकार ठोकला. यासह भारताची धावसंख्याही  85 पार गेली.  रोहितला साथ देण्यासाठी रिषभ पंत क्रीजवर आला आहे. टीम इंडियाला या सामन्यात कमबॅक करण्यासाठी या जोडीला मोठी भागीदारी करावी लागेल.

  • 05 Mar 2021 11:42 AM (IST)

    भारताला चौथा झटका, अजिंक्य रहाणे आऊट, लंचपर्यंत 4 बाद 80 धावा

    भारताला चौथा झटका लागला आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आऊट झाला आहे. अजिंक्यने 27 धावा केल्या.  जेम्स अँडरसनने अजिंक्यला बेन स्टोक्सच्या हाती कॅच आऊट केलं. रहाणे मैदानात सेट झाला होता. रोहितसोबत त्याने भारताचा डाव सावरला होता. त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण रहाणेला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही.

  • 05 Mar 2021 11:23 AM (IST)

    रोहित-अजिंक्यने टीम इंडियाला सावरलं

    चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली झटपट बाद झाल्यानंतर मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. विराट शून्यावर बाद झाल्यानंतर भारताची 41-3  अशी स्थिती झाली होती. त्यानंतर रोहित आणि अजिंक्यने भारताचा डाव सावरला आहे.

  • 05 Mar 2021 10:53 AM (IST)

    कॅप्टन कोहली शून्यावर बाद, टीम इंडिया संकटात

    चेतेश्वर पुजारानंतर टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. कॅप्टन विराट कोहली शून्यावर बाद झाला आहे. बेन स्टोक्सने विराटला फोक्सच्या हाती कॅच आऊट केलं आहे. विराट बाद झाल्याने टीम इंडियाचा डाव पुन्हा अडखळला आहे. विराटनंतर रोहितची साथ देण्यासाठी अजिंक्य रहाणे मैदानात आला आहे. त्यामुळे या मुंबईकर जोडीवर टीम इंडियाची भिस्त असणार आहे.

  • 05 Mar 2021 10:30 AM (IST)

    टीम इंडियाला दुसरा धक्का

    टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. भारताचा  तारणहार असलेला चेतेश्वर पुजारा 17 धावांवर आऊट झाला आहे. जॅक लीचने पुजाराची शिकार केली. लीचने पुजाराला एलबीडब्लयू केलं.

  • 05 Mar 2021 10:06 AM (IST)

    रोहितचा खणखणीत चौकार

    दुसऱ्या दिवसातील पहिला चौकार हिटमॅन रोहितने लगावला. रोहितने बेन स्टोक्सच्या बोलिंगवर हा चौकार लगावला.

  • 05 Mar 2021 10:02 AM (IST)

    3 षटकांत 3 धावा

    दुसर्‍या दिवसाच्या खेळातील भारतीय डावातील 3 षटके गोलंदाजी झाली आहे. या 3 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 3 धावा केल्या आहेत.रोहित 11 आणि पुजारा 15 धावांवर खेळत आहेत. या 3 ओव्हर्सपैकी अँडरसनने 2 षटक तर स्टोक्सने एक ओव्हर टाकली. स्टोक्सने ही ओव्हर मेडन टाकली.

  • 05 Mar 2021 09:34 AM (IST)

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने दुसऱ्या दिवसातील पहिली ओव्हर टाकली. तर टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.  या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

  • 05 Mar 2021 08:45 AM (IST)

    चौथ्या कसोटीतील दुसरा दिवस

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील आजचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसावर वर्चस्व राखलं. टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी 205 धावांवर गुंडाळला. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळापर्यंत टीम इंडियाने 1 विकेट गमावून 24 धावा केल्या. भारताने शुबमन गिलची एक विकेट गमावली. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत.