चेन्नई : बॉर्डर गावसकर मालिकेत (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात रिषभ पंतने (Rishabh Pant) निर्णायक क्षणी विजयी खेळी केली. यामुळे टीम इंडियाने सामन्यासह मालिका जिंकली. पंतच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. आजी माजी क्रिकेटपटूंनीही त्याची प्रशंसा केली. दरम्यान आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्ननेही (Michael Vaughan) पंतचं कौतुक केलं आहे. (India vs England 2021 Former England captain Michael vaughan compares Rishabh Pant to Ben Stokes and Virender Sehwag)
“पंत हा वीरेंद्र सेहवाग आणि बेन स्टोक्ससारखा आक्रमक फलंदाज आहे. विरोधी गोलंदाजांवर हल्ला चढवण्याची क्षमता त्याच्यात आहे. पंत असाच सातत्याने मोठी खेळी करत राहिला तर तो टीम इंडियाचा मॅच विनर प्लेअर म्हणून नावारुपास येईल”, असं वॉर्न म्हणाला. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेआधी वॉर्न स्काय स्पोर्ट्स चॅनेलवरील एका कार्यक्रमात उपस्थित होता. यावेळस त्याने पंतबाबत प्रतिक्रिया दिली.
“पंत हा बेन स्टोक्ससारखा इंटरटेनमेंट करणारा खेळाडू आहे. तो जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा मी आवर्जून पाहतो. पंत खेळत असताना इतर कोणत्याही खेळाडूने धावा करु नये, असं मला वाटतं. तो खेळतो तेव्हा नक्कीच काही तरी घडतं. पंत अशाच ताकदीने आणि उत्साहाने खेळत राहिल्यास तो विरोधकांसाठी डोकेदुखी ठरेल”, असंही वॉर्नने स्पष्ट केलं.
ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर पंतला आयसीसीने Player of the Month या पुरस्करासाठी नामांकन दिलं आहे. पंतसह या पुरस्कारासाठी इंग्लंडचा जो रुट आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांच्यात कडवी झुंज आहे.
या बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिल्या सामन्यात पंतने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला डच्चू देण्यात आला. मात्र त्यानंतर सिडनी कसोटीमध्ये संधी देण्यात आली. या सामन्यात त्याने 97 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला सामना अनिर्णित राखण्यास यश आले. यानंतर त्याने चौथ्या आणि अंतिम सामन्यात केलेली कामगिरी प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहिती आहे. पंतने मोक्याच्या क्षणी गिअर बदलत जोरदार फटकेबाजी केली. यामुळे टीम इंडियाचा विजय झाला. पंतने नाबाद 89 धावांची शानदार खेळी केली होती.
दरम्यान टीम इंडिया आता इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेत पंत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
संबंधित बातम्या :
आयसीसीच्या Player of the Month पुरस्कारासाठी 3 फलंदाजांमध्ये कडवी झुंज, रिषभ पंत शर्यतीत
Rishabh Pant | रिषभ पंत विकेटकीपींगमध्ये नक्कीच सुधारणा करेल : रिद्धीमान साहा
(India vs England 2021 Former England captain Michael vaughan compares Rishabh Pant to Ben Stokes and Virender Sehwag)