आधी लाजिरवाणा पराभव, 10 चेंडूत 5 सिक्स खेचणारा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर, स्फोटक खेळाडूचं कमबॅक

| Updated on: Feb 16, 2021 | 6:38 PM

टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने टीमची (england announced squad for 3rd Ahmedabad test) घोषणा केली आहे.

आधी लाजिरवाणा पराभव, 10 चेंडूत 5 सिक्स खेचणारा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर, स्फोटक खेळाडूचं कमबॅक
टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची घोषणा
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंड  (India vs England 2nd Test) संघाचा 317 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. इंग्लंडला पराभवासह दुहेरी झटका बसला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने (Moeen Ali)  उर्वरित 2 सामन्यांमधून माघार घेतली आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या इंग्लंडसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. (india vs england 2021 test series england announced squad for 3rd Ahmedabad test moeen ali out jonny bairstow returns)

इंग्लंडने टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. यामध्ये मोईन अलीने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याचं समजलं. तर संघात अलीच्या जागेवर आक्रमक विकेटकीपर फलंदाज जॉनी बेअरस्टोचे पुनरागमन झालं आहे.

10 चेंडूत 5 सिक्स, मोईन अलीची फटकेबाजी

मोईन अलीने दुसऱ्या कसोटीतील चौथ्या डावात जोरदार बॅटिंग केली. मोईनने अवघ्या 18 चेंडूत 5 सिक्स आणि 3 फोरसह शानदार 43 धावा केल्या. मोईनने या खेळीतील 5 सिक्स हे पहिल्या 10 चेंडूमध्ये लगावले. त्यातही अक्षर पटेलच्या ओव्हरमध्ये मोईनने सलग 3 सिक्स खेचले. तिसऱ्या कसोटीतून मोईनला वगळण्याचे कारण स्पष्ट करताना कर्णधार जो रूट म्हणाला की, “मोईनने स्वत: दुसर्‍या कसोटीनंतर मायदेशी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना बायो बबलमधून बाहेर यायचे आहे. आणि हा योग्य निर्णय आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो”.

जॉनी बेयरस्टोचे कमबॅक

मोईन अलीने माघार घेतल्याने उर्वरित 2 सामन्यांसाठी संघात जॉनी बेयरस्टोला संधी देण्यात आली आहे. विकेटकीपर म्हणून बेयरस्टोची तगडा रेकॉर्ड आहे. बेयरस्टोने 2016 मध्ये स्टंपमागे सर्वाधिक फलंदाजांना आऊट (कॅच&स्टंपिंग) करण्याची कामगिरी केली आहे. जॉनीने एकूण 70 फलंदाजांना आऊट करण्याची विक्रमी खेळी केली आहे. तसेच त्याने विकेटकीपर फलंदाज म्हणून एका वर्षात सर्वाधिक 1 हजार 470 धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे टीम इंडियाला जॉनी बेयरस्टोपासून सावध रहावं लागणार आहे.

इंग्लंडची चौथ्या क्रमांकावर घसरण

टीम इंडियाने इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव केल्याचा तगडा फटका बसला आहे. इंग्लंडची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपच्या रँकिंगमध्ये 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. इंग्लंडची थेट दुसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे.

तिसरी कसोटी 24 फेब्रुलवारीपासून

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24-28 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा डे नाईट सामना असणार आहे. गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम :

जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउले, रोरी बर्न्स , बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबले, बेन फोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाची ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये मोठी झेप

Axar Patel | मॅकेनिकल इंजिनियर बनण्याचं स्वप्न, नववीत असताना क्रिकेटच वेड, आता 42 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

कॅप्टन कुलच्या ‘या’ रेकॉर्डवर विराट कोहलीचा डोळा, तिसऱ्या कसोटीत धोनीला पछाडणार?

(india vs england 2021 test series england announced squad for 3rd Ahmedabad test moeen ali out jonny bairstow returns)