IND vs ENG 2nd ODI Live Score : स्टोक्सचा झंझावात, इंग्लंडचा भारतावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

| Updated on: Mar 26, 2021 | 9:58 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 6 विकेट्सने पराभव झाला.

IND vs ENG 2nd ODI Live Score : स्टोक्सचा झंझावात, इंग्लंडचा भारतावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी
India Vs England 2nd ODI
Follow us on

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 6 विकेट्सने पराभव झाला. इंग्लडने आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतीय संघाने इंग्लंडपुढे 337 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाला इंग्लंडच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत सहज पूर्ण केलं. त्यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो याने 112 चेंडूत 124 धावा केल्या. तर बेनस्टोक्सने 52 चेंडूत 99 धावा केल्या.

इंग्लंडची धमाकेदार सुरुवात, पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी

भारताने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामीवीर जोडीने जबरदस्त सुरुवात केली. मात्र, अधिक धावा करण्याच्या नादात जेसन रॉय धावबाद झाला. रोहित शर्माने त्याला धावबाद केलं. पण जेसनने 52 चेंडूत 55 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाचा समावेश आहे. जेसन रॉय आणि बेयरस्टो दोघांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

बेन स्टोक्सचा झंझावात, 52 चेंडूत तब्बल 99 धावा

जेसन रॉय धावबाद झाल्यानंतर बेन स्टोक्सने मैदानावर येत जॉनी बेयरस्टोसोबत भागीदारी केली. दोघांनी डाव सावरत जबरदस्त फलंदाजी केली. बेन स्टोक्स आणि बेयरस्टो दोघांनी भारतीय गोलंदाजांना धो धो धुतलं. दरम्यान, बेयस्टोने आपलं शतक पूर्ण केलं. तर बेन स्टोक्स देखील जलद गतीने शतकाच्या दिशेला वाटचाल केली. पण त्याचं शतक पूर्ण होण्यासाठी अवघ्या एका धावाची गरज असताना भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. बेन स्टोक्सने अवघ्या 52 चेंडूत तब्बल 99 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार तर 10 षटकांचा समावेश आहे.

बेयरस्टोच्या 112 चेंडूत 124 धावा

बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर लगेच पुढच्या षटकात जॉनी बेयरस्टो देखील झेलबाद झाला. भारताच्या प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. बेयरस्टोने 112 चेंडूत 124 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार तर 7 षटकांचा समावेश आहे. बेयरस्टोनंतर लगेच मैदनात उतरलेला जॉस बटलरही स्वस्तार तंबूत परतला. प्रसिद्ध कृष्णाने मोठ्या चालाखीने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर लियम लिविंगस्टो आणि डेव्हिड मलान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे संयमी खेळी करत या जोडीने इंग्लंडला विजयी केलं. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 2 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली.

भारताची खराब सुरुवात

दरम्यान,आजच्या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचे दोन्ही सलामवीर स्वस्तात परतले. रोहित शर्मा (25) आणि शिखर धवन (4) त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करु शकले नाहीत. 37 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला.

विराटने 79 चेंडूत 66 धावा फटकावल्या. विराट आज खूप संयमाने खेळला. परंतु आज पुन्हा एकदा विराट शतक लगावू शकला नाही. तसेच विराट आज पुन्हा एकदा आदिल रशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या ऋष पंतने इंग्लिश गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. पंतने प्रत्येक गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ऋषभ पंतने अवघ्या 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 77 धावा फटकावल्या. तर के. एल राहुलने आज शतक झळकावलं. राहुलने 114 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 108 धावा फटकावल्या.

के. एल. राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून तब्बल 11 षटकार ठोकले. पंत बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने धावगती कायम ठेवली. पंड्याने 16 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 35 धावा फटकावल्या. पंतने 7 तर पंड्याने 4 षटकार ठोकून पुण्याचे गहुंजे मैदान दणाणून सोडलं. दोघांनी मिळून 11 षटकार ठोकले. कृणाल पंड्या 12 धावांवर नाबाद राहिला. आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी एकूण 14 षटकार आणि 20 चौकार फटकावले.

Key Events

भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर

भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात 66 धावांनी पराभूत करुन मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी विजयी सलामी नोंदवली आहे.

दोन्ही संघांना दुखापतीचं ग्रहण

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे तर इंग्लंडचा नियमित कर्णधार ओयन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्ज दुखापतग्रस्त आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Mar 2021 08:52 PM (IST)

    भारताला चौथं यश, जॉस बटलरचा त्रिफळा

    भारताला चौथं यश, प्रसिद्ध कृष्णाने जॉस बटलरचा तिसऱ्याच चेंडूत त्रिफळा उडवला

  • 26 Mar 2021 08:50 PM (IST)

    भारताला तिसरं यश, जॉनी बेयरस्टो बाद

    भारताला तिसरं यश, जॉनी बेयरस्टो बाद, बेयरस्टोने 112 चेंडूत 124 धावा केल्या, इंग्लंड 287 धावांवर 3 बाद


  • 26 Mar 2021 08:45 PM (IST)

    इंग्लंडला दुसरा झटका, बेन स्टॉक्स अवघ्या एक धावासाठी शतक हुकलं

    भारताला दुसरा दिलासा मिळाला आहे. बेन स्टॉक्सची विकेट घेण्यात यश आलं आहे. बेन स्टॉक्स सध्या प्रचंड फॉर्ममध्ये होता. त्याने 52 चेंडूत 99 धावा केल्या

  • 26 Mar 2021 08:35 PM (IST)

    इंग्लंडची जोरदार घोडदौड सुरु, 34 षटकात 250 धावा पार

    इंग्लंडची जोरदार घोडदौड सुरु, 34 षटकात 250 धावा पार, बेन स्टोक्सचे 50 चेंडूत 95 धावा, शतकाच्या दिशेला वाटचाल, तर बेयरस्टोचे शतक पूर्ण

  • 26 Mar 2021 07:42 PM (IST)

    इंग्लंडच्या फलंदाजांना दाबण्यात शार्दूलला यश, 25 व्या षटकात फक्त तीन धावा

    इंग्लंडच्या 25 षटकात 167 धावा, सध्या बेन स्टोक्सची अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे. पण 25 व्या षटकात शार्दूलने त्यांना फक्त तीन धावा घेऊ दिल्या.

  • 26 Mar 2021 07:39 PM (IST)

    कृणाल पांड्याच्या शेवटच्या चेंडूवर स्टोक्सचा जबरदस्त सिक्स

    इग्लंडच्या फलंदाजांची जोरदार फटकेबाजी सुरु आहे. कृणाल पांड्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेन स्टोक्सने जोरदार षटका लगावत इंग्लडचे स्कोर 164 वर पोहोचवला.

  • 26 Mar 2021 07:27 PM (IST)

    इंग्लंडच्या 21 षटकात 130 धावा

    इंग्लंडने 21 षटकात 130 धावा केल्या आहेत. सध्या बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो फलंदाजी करत आहेत.

  • 26 Mar 2021 07:08 PM (IST)

    भारताला पहिलं यश, जेसन रॉय 55 धावांवर बाद, इंग्लंड 1 बाद 110

    दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पहिलं यश मिळालं आहे. जेसन रॉय 55 धावांवर धावबाद. रोहित शर्माचं अप्रतिम क्ष्रेरक्षण

  • 26 Mar 2021 07:06 PM (IST)

    बेयरस्टोचं सलग दुसरं अर्धशतक

    जॉनी बेयरस्टोने आज सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. बेयरस्टोने 45 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 50 धावा फटकावल्या आहेत.

  • 26 Mar 2021 07:03 PM (IST)

    इंग्लंडची विजयाच्या दिशेने कूच, 15.3 षटकात 100 धावा

    इंग्लंडच्या सलामीवीरांनी विजयाच्या दिशेने कूच केली आहे. 15.3 षटकांमध्ये इंग्लंडने धावफलकावर 100 धावा झळकाल्या आहेत. इंग्लिश सलामीवीरांनी आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला यश मिळू दिलेलं नाही

  • 26 Mar 2021 06:58 PM (IST)

    जेसन रॉयचं अर्धशतक

    कुलदीप यादवच्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकत जेसन रॉयने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. रॉयने 48 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार ठोकला आहे.

  • 26 Mar 2021 06:30 PM (IST)

    इंग्लंडच्या 9 षटकात 51 धावा

    9 षटकांमध्ये इंग्लंडने धावफलकावर 51 धावा झळकावल्या आहेत. इंग्लंडच्या सलामीवीरांनी आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला यश मिळू दिलेलं नाही.

  • 26 Mar 2021 06:13 PM (IST)

    जेसन रॉयचं प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर आक्रमण

    जेसन रॉयने नवोदित गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर आक्रमण सुरु केलं आहे. कृष्णाच्या तिसऱ्या षटकात रॉयने तीन चौकार फटकावत कृष्णाला बॅकफुटवर ढकललं आहे.

  • 26 Mar 2021 05:50 PM (IST)

    337 धावांचं आव्हान घेऊन इंग्लंडची सलामीची जोडी मैदानात

    337 धावांचं आव्हान घेऊन इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो जोडी मैदानात उतरले आहेत. भारताकडून भूवनेश्वर कुमारने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.

  • 26 Mar 2021 05:22 PM (IST)

    6 गड्यांच्या बदल्यात भारताचा इंग्लंडसमोर 336 धावांचा डोंगर, राहुलचं शतक, कोहली-पंतची अर्धशतकं

    प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या बदल्यात भारताने इंग्लंडसमोर 336 धावांचा डोंगर उभा केला आहे. के. एल. राहुलचं शतक, कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

  • 26 Mar 2021 05:18 PM (IST)

    भारताला सहावा फलंदाज माघारी, हार्दिक पंड्याच्या 16 चेंडूत 35 धावा

    334 भारताला सहावा फलंदाज माघारी परतला आहे. हार्दिक पंड्याने 16 चेंडूत 35 धावांवर हार्दिक पंड्या बाद.

  • 26 Mar 2021 05:03 PM (IST)

    भारताला पाचवा झटका, 77 धावांवर ऋषभ पंतची वादळी खेळी संपुष्टात

    भारताला पाचवा गडी माघारी परतला आहे. 40 चेंडूत 77 धावा करुन ऋषभ पंत बाद. टॉम करनच्या खात्यात दुसरी विकेट

  • 26 Mar 2021 04:59 PM (IST)

    46.1 षटकात भारताच्या 4 बाद 300 धावा, पंत-पंड्याचं इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण

    47 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंतने षटकार ठोकत धावफलकावर भारताच्या 300 धावा झळकावल्या आहेत.

  • 26 Mar 2021 04:53 PM (IST)

    हार्दिक पंड्याचं सॅम करनच्या गोलंदाजीवर आक्रमण

    सॅम करनच्या सातव्या षटकातील पाचव्चेंया डूवर हार्दिक पंड्याचा शानदार षटकार

  • 26 Mar 2021 04:52 PM (IST)

    ऋषभ पंतचं आक्रमण

    सॅम करनच्या सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतचा शानदार षटकार

  • 26 Mar 2021 04:51 PM (IST)

    हार्दिक पंड्याचा शानदार षटकार

    के. एल. राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पंड्याने सॅम करनच्या सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकून खातं उघडलं आहे.

  • 26 Mar 2021 04:49 PM (IST)

    भारताचा चौथा गडी माघारी, के.एल. राहुल 108 धावांवर बाद

    271 धावांवर भारताचा चौथा गडी माघारी परतला आहे. के. एल. राहुल 108 धावांवर बाद झाला. त्याने 114 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 108 धावा फटकावल्या.

  • 26 Mar 2021 04:40 PM (IST)

    के. एल. राहुलचं कारकीर्दीतलं पाचवं शतक, 108 चेंडूत 100 धावा

    के. एल. राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे. 108 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने राहुलने 100 धावा फटकावल्या.

  • 26 Mar 2021 04:32 PM (IST)

    इंग्लिश गोलंदाजांवर ऋषभ पंतचं आक्रमण, 28 चेंडूत अर्धशतक

    धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतने इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण सुरु केलं आहे. अवघ्या 28 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने पंतने 50 धावा फटकावल्या आहेत.

  • 26 Mar 2021 04:16 PM (IST)

    राहुल-पंतची अर्धशतकी भागीदारी

    लोकेश राहुल (नाबाद 84) आणि ऋषभ पंत (27) या दोघांनी 45 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे.

  • 26 Mar 2021 04:13 PM (IST)

    राहुल-पंतचा आक्रमक पवित्रा, 39 षटकात 3 गड्यांच्या बदल्यात भारताचं द्विशतक

    लोकेश राहुल (नाबाद 82) आणि ऋषभ पंत (22) या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरु केलं आहे. 39 व्या षटकात भारताने धावफलकावर द्विशतक झळकावलं आहे. उर्वरीत 11 षटकांमध्ये किंमान 100 धावा जमवण्याचा निर्धार भारतीय फलंदाजांनी स्पष्ट केला आहे.

  • 26 Mar 2021 04:08 PM (IST)

    आदिल रशीदच्या गोलंदाजीवर पंतचं आक्रमण

    38 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने शानदार षटकार ठोकला.

  • 26 Mar 2021 03:42 PM (IST)

    भारताला तिसरा झटका, कर्णधार विराट कोहली 66 धावांवर बाद

    भारताचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. विराट कोहली इग्लंडंविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 66 धावांवर बाद झाला आहे.

  • 26 Mar 2021 03:34 PM (IST)

    के. एल. राहुलचं सलग दुसरं अर्धशतक

    के. एल. राहुलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग दुसरं आणि वैयक्तिक 10 वं अर्धशतक ठोकलं आहे. राहुलने 66 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने अर्धशतक लगावलं आहे.

  • 26 Mar 2021 03:30 PM (IST)

    आदिल रशीदच्या गोलंदाजीवर विराटचा षटकार

    29 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने फिरकीपटू आदिल रशीदच्या गोलंदाजीवर वैयक्तिक आणि भारताच्या डावातील पहिला षटकार ठोकला

  • 26 Mar 2021 03:28 PM (IST)

    विराट-राहुलने डाव सावरला, तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    8.4 षटकात 37 धावांवर दोन्ही सलामीवीर बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. परंतु कर्णधार विराट कोहली (60) आणि लोकेश राहुल (46) या दोघांनी भारताचा डाव सावरला आहे. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 120 चेंडूत 100 धावांची नाबाद भागीदारी रचली आहे.

  • 26 Mar 2021 03:25 PM (IST)

    विराट कोहलीचं सलग दुसरं अर्धशतक

    कर्णधार विराट कोहलीने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आहे. विराटने 63 चेंडूत 50 धावा जमवल्या आहेत.

  • 26 Mar 2021 03:13 PM (IST)

    22.1 षटकात 2 विकेटच्या बदल्यात भारताचं शतक

    22.1 षटकांमध्ये भारताने धावफलकावर शतक झळकावलं आहे. आतापर्यंत भारताचे दोन्ही सलामीवीर (रोहित शर्मा-शिखर धवन) माघारी परतले असून कर्णधार विराट कोहली (42) आणि लोकेश राहुल (34) सावधपणे खेळत आहेत. दोघांनी आतापर्यंत चौथ्या गड्यासाठी नाबाद 63 धावांची भागीदारी रचली आहे.

  • 26 Mar 2021 03:00 PM (IST)

    विराट-राहुलने डाव सावरला, तिसऱ्या विकेटसाठी 50 धावाची भागीदारी

    8.4 षटकात 37 धावांवर दोन्ही सलामीवीर बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. परंतु कर्णधार विराट कोहली (32) आणि लोकेश राहुल (26) या दोघांनी भारताचा डाव सावरला आहे. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 65 चेंडूत 50 धावांची नाबाद भागीदारी रचली आहे.

  • 26 Mar 2021 02:29 PM (IST)

    13 षटकात 2 विकेटच्या बदल्यात भारताचं अर्धशतक

    13 षटकांमध्ये भारताने धावफलकावर अर्धशतक झळकावलं आहे. आतापर्यंत भारताचे दोन्ही सलामीवीर (रोहित शर्मा-शिखर धवन) माघारी परतले असून कर्णधार विराट कोहली (16) आणि लोकेश राहुल (4) सावधपणे खेळत आहेत.

  • 26 Mar 2021 02:09 PM (IST)

    37 धावांवर भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा 25 धावा करुन बाद

    चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर रोहित शर्मा आज पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. रोहितने 25 चेंडूत 25 धावा केल्या. सॅम करनच्या गोलंदाजीवर आदिल रशीदने रोहितचा झेल टिपला. (भारत 2 बाद 37)

  • 26 Mar 2021 02:05 PM (IST)

    Reece Topley च्या एकाच षटकात रोहितचे 3 चौकार

    Reece Topley च्या एकाच षटकात रोहित शर्माने 3 चौकार ठोकत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली आहे. (8 षटकात भारत 1 बाद 36)

  • 26 Mar 2021 02:04 PM (IST)

    टॉप्लीच्या एकाच ओव्हरमध्ये रोहित शर्माचे तीन खणखणीत चौकार

    रोहित शर्मा आज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने टॉप्लीच्या एकाच ओव्हरमध्ये रोहित शर्माचे तीन खणखणीत चौकार लगावले.

  • 26 Mar 2021 02:01 PM (IST)

    रोहित शर्माचा तिसरा चौकार

    रोहित शर्माने टॉप्लीला चौकार मारलाय. ऑनला साईडला त्याने चौकार खेचलाय…

  • 26 Mar 2021 01:58 PM (IST)

    विराट कोहलीचा पहिला चौकार

    भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिला चौकार लगावला आहे. फाईन लेगच्या दिशेला हा पहिला चौकार मारला आहे.

  • 26 Mar 2021 01:56 PM (IST)

    रोहित शर्माच्या बॅटमधून खणखणीत चौकार

    रोहित शर्माने आपल्या बॅटमधून दुसरा खणखणीत चौकार लगावला आहे.

  • 26 Mar 2021 01:56 PM (IST)

    पाचव्या षटकात पहिला चौकार

    दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय डावातील पहिला चौकार 5 व्या षटकात आला. सॅम करनच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहितने चौकार ठोकला. मात्र, पुढील 5 चेंडूंवर रोहितला एकही धावा करता आली नाही. 5 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 विकेटच्या बदल्यात 13 धावा इतकी झाली आहे.

  • 26 Mar 2021 01:48 PM (IST)

    भारताला पहिला झटका, शिखर धवन 4 धावांवर बाद

    पहिल्या एकदिवसीय सामन्यात 98 धावा फटकावणारा भारताचा सलामीवीर दुसऱ्या सामन्यात शिखर धवन अवघ्या 4 धावांवर बाद झाला. (भारत 1 बाद 9)

  • 26 Mar 2021 01:15 PM (IST)

    दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया