अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुसरा टी 20 सामना (India vs England 2nd T20I) खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी युवा इशान किशन (Ishan Kishan) आणि फिरकीपटू अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने या दोन्ही खेळाडूंचं टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण ठरलं आहे. इशान किशनला मुख्य कोच रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीने कॅप देऊन टीममध्ये स्वागत केलं. तसेच इतर सहकाऱ्यांनीही या दोघांचं अभिनंदन केलं. तसेच शुभेच्छाही दिल्या. (india vs england 2nd t 20 suryakumar yadav and ishan kishan make his t 20 debuts)
BIG DAY for @surya_14kumar & @ishankishan51 who are all set for their T20I debuts ??
What a moment for these two ?? #TeamIndia ????#INDvENG @Paytm pic.twitter.com/cFVVxDgvIO
— BCCI (@BCCI) March 14, 2021
बीसीसीआयने या सर्व प्रकाराचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हे दोन्ही फलंदाज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. या दोघांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये आपल्या टीमसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच आधारावर दोघांनी या टी 20 मालिकेसाठी संधी देण्यात आली.
हे दोन्ही खेळाडू आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी परिचित आहेत. दोघांमध्येही एकहाती सामना पालटण्याची क्षमता आहे. आतापर्यंत यांनी अनेकदा मुंबईला सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेत दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
सूर्यकुमार आयपीएलच्या 13 व्या मोसमात 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. आयपीएल 2019 मध्ये सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या. आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये 86 डावांत फलंदाजी करताना 30.2 च्या सरासरीने सूर्यकुमारने 2024 धावा फटकावल्या आहेत. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
इशानने 13 व्या मोसमातील 14 सामन्यातील 13 डावात बॅटिंग केली. यामध्ये त्याने 145.76 च्या स्ट्राईक रेटने तसेच 57.33 च्या सरासरीने 13 डावांमध्ये 36 चौकार आणि 30 षटकारांसह 516 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. इशानची 99 ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
विराट कोहली (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , भुवनेश्वर कुमार, आणि युझवेंद्र चहल.
संबंधित बातम्या :
Suryakumar Yadav | मी खूप काळापासून विराटच्या नेतृत्वात खेळण्याचे स्वप्न पाहत होतो : सूर्यकुमार यादव
(india vs england 2nd t 20 suryakumar yadav and ishan kishan make his t 20 debuts)