मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील दुसरा टी ट्वेन्टी सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Ground) खेळवण्यात येईल. या सामन्यात भारत विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल तसंच पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा भारत पूरेपूर प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात बॅटिंगमध्ये झालेल्या चुका सुधारुन आता दुसऱ्या मॅचमध्ये साहेबांना पराभवाचं तोंड पाहायला लावण्याचा इरादा टीम इंडियाच्या खेळाडूंनी बोलून दाखवलाय. (India Vs England 2nd t20 Match Narendra Modi Ground)
खरंतर एका पराभवाने भारतीय संघ हार मानत नाही. कारण समस्त क्रिकेट रसिकांच्या डोळ्यासमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका आहे. अगदी 36 धावांवर ऑलआऊट होऊन देखील भारतीय संघाने हार न मानता कांगारुंना त्यांच्यात भूमीत हरविण्याचा पराक्रम केला. साहजिक विराट सेनेला मालिकेत कमबॅक करणं काय असतं, हे चांगलंच ठाऊक आहे.
पहिल्या टी 20 सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला संधी देण्यात आली नव्हती. त्याला आराम करण्यास सांगितलं गेलं होतं. रोहितच्या अनुपस्थिती भारतीय संघाला पावलोपावली जाणवली. आता दुसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा खेळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. रोहितचा अंतिम 11 मध्ये संघात समावेश न होण्यावरुनही भारताचा दिग्गज क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने रोहितचा संघात समावेश नसल्याने विराटला सुनावलं होतं.
गेल्या अनेक मॅचमध्ये विराट कोहलीची बॅट बोलली नाहीय. आज तरी ती तळपेल, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट रसिक करत आहेत. आज जर त्याच्या बॅटने कमाल केली तर भारतीय संघाला विजय मिळण्यापासून कुणी रोखू शकत नाही.
(India Vs England 2nd t20 Match narendra Modi Ground)
हे ही वाचा :
देव कधी रिटायर होत नाही, सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक!