अहमदाबाद : भारताने पाहुण्या इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 7 विकेट्सने शानदार (India vs England 2nd T20i) विजय मिळवला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पदार्पणवीर इशान किशन (Ishan Kishan) हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. कर्णधार विराटने नाबाद 73 तर इशानने 56 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 94 धावांची भागीदारी केली. यासह या दोघांनी अनेक विक्रम केले आहेत. (india vs england 2nd t20i virat kohli and ishan kishan record)
विराटने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. हे अर्धशतक विराटच्या टी 20 कारकिर्दीतील 26 वं अर्धशतक ठरलं. यासह विराट रोहित शर्माला पछाडत टी 20 मध्ये सर्वाधिक अर्धशतक लगावणारा भारतीय फलंदाज ठरला. रोहितने टी 20 मध्ये 25 अर्धशतक झळकावली आहेत. तसेच विराटने या अर्धशतकी खेळीसह किर्तीमान केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. विराटने टी 20 मध्ये 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला.
Who else could it have been?@imVkohli became the first player to score 3000 runs in men's T20Is last night ?#INDvENG pic.twitter.com/iK87PmnCNF
— ICC (@ICC) March 15, 2021
इशान किशनने या सामन्यातून टी 20 पदार्पण केलं. त्याने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली. इशान पदार्पणात अर्धशतक झळकावणारा दुसरा भारतीय ठरला. याआधी अजिंक्य रहाणेने अशी कामगिरी केली होती.
श्रेयस अय्यरने या सामन्यात नाबाद 8 धावा केल्या. श्रेयसने 4 धावा करताच त्याने आपल्या टी 20 कारकिर्दीतील 500 धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो 9 वा भारतीय ठरला.
या सामन्यात सलामीवीर केएल राहुल शून्यावर बाद झाला. केएलची टी 20 मध्ये शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ ठरली.
टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्धचा टी 20 मधील 8 वा विजय ठरला. आतापर्यंत उभय संघात एकूण 16 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत.
मालिका बरोबरीत
दरम्यान हा सामना जिंकत टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा सामना हा मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | कॅप्टन विराटसोबत पहिल्यांदा खेळण्याचा अनुभव कसा होता, चहलच्या प्रश्नावर इशान काय म्हणाला?
PHOTO | शानदार जबरदस्त ! किशनची ‘इशान’दार खेळी, केला सचिन-धोनीसारख्या दिग्गजांना न जमलेला कारनामा
(india vs england 2nd t20i virat kohli and ishan kishan record)