चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा (India vs England 2nd Test) खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 300 धावा केल्या. पहिल्या दिवसापर्यंत टीम इंडियाकडून हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 161 धावांची शानदार खेळी केली. तर अजिंक्यने रोहितला चांगली साथ देत 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. रोहितने आपल्या 161 धावांच्या खेळीसह एक अफलातून कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. (india vs england 2nd test 1st day rohit sharma become first batsman who hit 200 sixes in india)
रोहितने आपल्या खेळीमध्ये एकूण 2 सिक्स लगावले. यामध्ये रोहितने सामन्याच्या 38 व्या ओव्हरमध्ये मोईन अलीच्या बोलिंगवर जोरदार सिक्स खेचला. यासह रोहितने सिक्सचे द्विशतक पूर्ण केलं. म्हणजेच रोहितने भारतात 200 सिक्स लगावण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव भारतीय ठरला.
रोहित शर्मा – 200*
महेंद्रसिह धोनी – 186
युवराज सिंह – 113
वीरेंद्र सेहवाग – 111
विराट कोहली – 110
सचिन तेंडुलकर – 107
टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. भारताने 86 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडियाची बिकट स्थिती झाली होती. पण यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी 162 धावांची जबरदस्त भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रोहितने शानदार दीडशतक पूर्ण केलं. तर रहाणेनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण यानंतर हे दोन्ही सेट फलंदाज बाद झाले.
दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत आणि अक्षर पटेल मैदानात खेळत होते. या जोडीकडून दुसऱ्या दिवशी चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
संबंधित बातम्या :
(india vs england 2nd test 1st day rohit sharma become first batsman who hit 200 sixes in india)