चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यादरम्यान विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडच्या ओली पोपचा (Ollie Pope) हवेत झेपावत एकहाती कॅच घेतला. रिषभ पंतने घेतलेल्या या अफलातून कॅचनंतर त्याचं कौतुक करण्यात येत आहे. तसेच त्याच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच पंत ट्विटरवर ट्रेंड होत आहे. (India vs England 2nd Test 2nd day Wicketkeeper Rishabh Pant caught Oli Pope with one hand)
Rishabh spidey pant pic.twitter.com/PDiBxi2AQ7
— Anuroop (@rohitfanboy45) February 14, 2021
मोहम्मद सिराज भारतात पहिल्यांदा बोलिंग करत होता. कॅप्टन विराटने सिराजला इंग्लंडच्या डावातील 39 वी ओव्हर टाकायला दिली. सिराजने आपल्या कोट्यातील शॉर्ट बोल टाकला. हा बोल लेग साईडच्या दिशेने जात होता. या चेंडूवर पोपने फटकावण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला स्पर्श करत विकेटकीपर पंतच्या दिशेने निघाला. चेंडू पंतपासून थोडा दूर होता. पण पंतने वेळीच हवेत झेपावत शानदार कॅच घेतला.
संबंधित बातम्या :
India vs England 2nd Test | इंग्लंडच्या गोलंदाजांची अफलातून कामगिरी, 66 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
(India vs England 2nd Test 2nd day Wicketkeeper Rishabh Pant caught Oli Pope with one hand)