चेन्नई | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 13 फेब्रुवारीपासून (India vs England 2021) पेटीएम कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी मॅच खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा (Team India) पहिल्या कसोटी सामन्यात 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभव झाला होता. यामुळे भारत या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेच्या तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) दृष्टीने हा दुसरा सामना भारतासाठी महत्वाचा झाला आहे. भारताला जर या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळायचं असेल तर, कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडला दुसरा सामना जिंकण्यापासून रोखावं लागणार आहे. (india vs england 2nd test match team india batsman have not scored hundred last 5 test matches)
टीम इंडियाचे काही बॅट्समन चांगली खेळी करत आहेत. पण त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयशी ठरत आहेत. टीम इंडियाच्या फलंदाजांकडून गेल्या 10 डावांमध्ये (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) फक्त 1 शतक लगावण्यात आलं आहे. शतक न लगावनं टीम इंडियाला चांगलचं महागात पडलं आहे. हेच टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे.
ऑस्ट्रेलिया विरोधातील पहिल्या कसोटीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात कर्णधार रहाणेने शानदार शतक लगावलं. त्याने 112 धावांची खेळी केली. मात्र यानंतरच्या 3 कसोटींमधील 6 डावांमध्ये टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आले नाही. याचाच अर्थ असा की गेल्या 10 डावांमध्ये टीम इंडियाकडून केवळ 1 शतकाची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला तिहेरी आकडा गाठण्यास यश आले नाही. सिडनी कसोटीतील दुसऱ्या डावात रिषभ पंतने अफलातून बॅटिंग केली. त्याची खेळी निर्णायक ठरली. पण तो नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. अर्थात त्याचे शतक 3 धावांनी हुकले. तो 97 धावांवर बाद झाला. पंतने अजून काही वेळ मैदानात घालवला असता तर त्याचे शतकही पूर्ण झाले असते. सोबतच त्या सामन्याचा निकालही भारताच्या बाजूने लागू शकला असता.
बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सामन्यासह मालिकाही जिंकली. या सामन्यात टीम इंडियाचे 2 शिलेदार शतकाच्या जवळपास आले होते. पण ते दोघेही अपयशी ठरले. शुबमन गिलचे शतक 9 तर पंतचे शतक 11 धावांनी हुकले. अर्थात गिल 91 तर पंत 89 धावांवर बाद झाला.
ही झाली ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतील घटना. पण शतक न लगावण्याची मालिका इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत कायम राहिली. इथेही शतकाने पंत आणि वॉशिंग्टन सुंदरला हुलकावणी दिली. पंत नेहमी प्रमाणे नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. तो 91 धावांवर बाद झाला. तर वॉशिंग्टन सुंदरला शेपटीच्या फलंदाजांनी साथ न दिल्याने तो 85 धावांवर नाबाद राहिला. तर दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहली 72 धावांवर बाद झाला. एकूणच पाहिलं तर टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली सुरुवात तर मिळतेय. पण त्यांना त्या खेळीच मोठ्या आकड्यात रुपांतर करताना कुठेतरी अपयश येत आहे.
दरम्यान 13 फेब्रुवारीपासून पेटीएम टेस्ट सीरिजमधील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दमदार कामगिरी करत ही 10 डावांपासून सुरु असलेली नकोशी मालिका खंडीत काढतील अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
संबंधित बातम्या :
(india vs england 2nd test match team india batsman have not scored hundred last 5 test matches)