चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पेटीएम टेस्ट सीरिजमधील दुसरा कसोटी (India vs England 2nd Test ) सामना 13 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. इंग्लंडने भारतावर पहिल्या टेस्टमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. यामुळे इंग्लंडने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात जोरदार मुंसडी मारण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. यासाठी तगड्या प्लेइंग इलेव्हनचं निवड करणयाचं आव्हान टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन विराट कोहलीसमोर असणार आहे. (India vs England 2nd Test Team Prediction 11 in marathi Akshar Patel likely to get a chance)
टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून खेळण्याची संधी मिळाली नाही. तर अक्षर पटेल (Akshar Patel) हा टेस्टमध्ये नवखा खेळाडू आहे. त्यामुळे विराट कोणाला पसंती देणार हे महत्वाचं ठरणार आहे. मात्र विराटने काही दिवसांआधीच अक्षरला संधी देणार असल्याचे संकेत दिले होते.
कुलदीप यादव रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुदंर या फिरकीपटूंप्रमाणे चेंडू बाहेरच्या दिशेने स्पिन करतात. त्यामुळे एकाचसारखे 3 गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवणार नसल्याचे संकेत विराटने दिले होते. त्यामुळे अक्षरला या दुसऱ्या कसोटीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज आहेत. मात्र ही जोडी पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरली. यामुळे या दोघांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. रोहितला गेल्या 3 कसोटींमध्ये एकही अर्धशतक लगावता आलेले नाही. तर रहाणेही संघर्ष करताना दिसतोय. रहाणेने गेल्या 7 डावांमध्ये एकूण 50 धावा केल्या आहेत. मात्र यानंतरही दोघांचं स्थान निश्चित मानलं जात आहे.
वेगवान गोलंदाजांमध्येही बदल केले जाण्याची शक्यता फार कमी आहे. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा या दोघांनीही पहिल्या कसोटीत समाधानकारक कामगिरी केली होती. हो दोन्ही महत्वाचे गोलंदाज आहेत. त्यात टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. यामुळे या दोघांना कायम ठेवले जाण्याची शक्यता तीव्र आहे.
संभावित प्लेइंग इलेवन : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
संबंधित बातम्या :
India vs England 2021 | इंग्लंडला मोठा धक्का, हुकमाचा एक्का जायबंदी, दुसऱ्या कसोटीला मुकणार
(India vs England 2nd Test Team Prediction 11 in marathi Akshar Patel likely to get a chance)