India Vs England 3rd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा वन डे सामना, कुठे, कधी, केव्हा सामना?

| Updated on: Mar 28, 2021 | 8:31 AM

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना (India vs England 3rd ODI) आज (रविवारी) होतो आहे.

India Vs England 3rd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा वन डे सामना, कुठे, कधी, केव्हा सामना?
Ind vs Eng 3rd ODI
Follow us on

पुणे : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना (India vs England 3rd ODI) आज म्हणजेच रविवारी खेळला जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर (MCA Cricket Ground) हा सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. (india vs england 3rd ODI Live Streaming When Where Do watch)

सामना किती वाजता सुरु होणार?

सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

सामना कुठे खेळवण्यात येणार?

या सामन्याचे आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.

सामना कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहेत. सोबतच tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

सामना मोबाईलवर पाहता येणार का?

हॉटस्टार आणि जियो टीव्हीवर सामना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी असणार का?

कोरोना संसर्गाच्या पार्शअवभूमीवर या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नसणार आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

(india vs england 3rd ODI Live Streaming When Where Do watch)

हे ही वाचा :

Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंना डच्चू?, मालिका विजयासाठी विराट सेनेची नवी रणनीती!