Ind vs Eng : तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कुणाला मिळणार संधी, कुणाला डच्चू?, अशी असेल प्लेइंग 11

| Updated on: Mar 28, 2021 | 11:31 AM

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग 11 काय असेल, याची चर्चा सुरु आहे. आपण पाहूयात कुणाला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते... India vs England 3rd ODI Playing 11

Ind vs Eng : तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कुणाला मिळणार संधी, कुणाला डच्चू?, अशी असेल प्लेइंग 11
Ind vs Eng 3rd ODI
Follow us on

पुणे : भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध (Ind vs Eng) आज (रविवार)  निर्णायक लढत पार पडतीय. पुण्याच्या गहुंजे मैदानावर तिसरा आणि मालिकेतला अंतिम सामना खेळला जाईल. मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका कोण जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी पराभवाला कारणीभूत ठरली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग 11 काय असेल, याची चर्चा सुरु आहे. आपण पाहूयात कुणाला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते… (India vs England 3rd ODI Playing 11 Pune MCA Cricket Ground)

टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण सामना

इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अंतिम सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. जर भारताने आजचा सामना जिंकला तर भारतीय संघ मालिका जिंकून करंडकावर नाव कोरेन. तसंच भारताच्या आयसीसी वन डे रँकिंकमध्येही सुधारणा होईल. भलेही भारतीय संघ अंतिम सामना जिंकून इंग्लंडच्या रँकिंक पुढे जाणार नाही मात्र इंग्लंडच्या रँकिंगमधलं आणि भारताच्या रँकिंकमधलं अंतर कमी होईल.

भारतीय संघात होऊ शकतो बदल

भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. ते इंग्लिश फलंदाजांची धुलाई करण्यास सक्षम आहेत. मात्र गोलंदाजांची कामगिरी म्हणावी अशी होत नाहीय. याच कारणास्तव दुसरा एकदिवसीय सामना भारताला गमवावा लागला. त्याचमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात काही बदल होऊ शकतात.

क्रुणाल-कुलदीप आऊट, युजवेंद्र-वॉशिंग्टन इन?

तिसऱ्या सामन्यात टीममधून क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep yadav) आऊट होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. युजवेंद्र चहल सध्या फॉर्ममध्ये नसला तरी कर्णधार कोहलीकडे दुसरा कोणताही पर्याय अद्यापतरी नाही.

टी नटराजनला संधी?

क्रुणाल पांड्या बॅटिंगच्या जोरावर टीममध्ये संघात जागा टिकवू शकतो परंतु त्याचा बोलिंग बोलिंग परफॉर्मन्स त्याला मारक ठरणार आहे. भारताचं प्रमुख अस्त्र भुवनेश्वरबरोबर यॉर्कर किंग टी नटराजनला संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शार्दुल ठाकूर सध्या फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याला जर आराम दिला तर मोहम्मद सिराजचाही समावेश होऊ शकतो.

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग 11

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा और युजवेंद्र चहल

(India vs England 3rd ODI Playing 11 Pune MCA Cricket Ground)

हे ही वाचा :

India Vs England 3rd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा वन डे सामना, कुठे, कधी, केव्हा सामना?