India vs England 2021 3rd test | कसोटी कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात इशांत शर्माची झोकात सुरुवात, 3 ऱ्या ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का

| Updated on: Feb 24, 2021 | 3:52 PM

इशांत शर्मा (Ishant Sharma) टीम इंडियाकडून 100 कसोटी खेळणारा 11 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

India vs England 2021 3rd test | कसोटी कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात इशांत शर्माची झोकात सुरुवात, 3 ऱ्या ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का
इशांत शर्मा (Ishant Sharma) टीम इंडियाकडून 100 कसोटी खेळणारा 11 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी (india vs england 2021 3rd test) सामन्याला सुरुवात झाली आहे. हा तिसरा कसोटी सामना डे नाईट आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसरा कसोटी सामना हा इशांत शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना (Ishant Sharma) ठरला आहे. इशांत शर्मा टीम इंडियाकडून 100 सामने खेळणारा एकूण 11 वा तर कपिल देव यांच्यानंतर दुसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे. इशांतने आपल्या 100 व्या सामन्याची झोकात सुरुवात केली आहे. इशांतने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर डॉमनिक सिबलेला शून्यावर आऊट केलं (india vs england 3rd test Ishant Sharma became the 11th player from Team India to play 100 Test matches)

100 कसोटी खेळणारे भारतीय

सचिन तेंडुलकर(200), राहुल द्रविड़ (163), सुनील गावसकर (125), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), वीरेंद्र सेहवाग (103), सौरभ गांगुली (113), दिलीप वेंगसरकर (116), कपिल देव (131), अनिल कुंबळे (132), हरभजन सिंह (103) आणि इशांत शर्मा (100*)

इशांतचा राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांकडून सत्कार

इशांतच्या 100 व्या कसोटीआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी इशांतचा विशेष सत्कार केला. यावेळेस राष्ट्रपती कोविंद यांनी इशांतला एक खास भेट देऊन त्याला गौरवलं. तर यानंतर गृहमंत्री शाह यांनी एक स्पेशल कॅप देऊन इशांतचा सत्कार केला. यादरम्यानचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.

सहकाऱ्यांकडून मैदानात जोरदार स्वागत

तिसऱ्या कसोटीला दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले. यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनाी समोरासमोर उभं राहतं इशांत शर्माचं टाळ्या वाजवतं मैदानात स्वागत केलं. यावेळेस स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांनीही इशांतचं अभिनंदन केलं.

इशांतची कसोटी कारकिर्द

इशांतने 25 मे 2007 ला बांगलादेश विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून इशांत टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. इशांतने आतापर्यंत एकूण 99 कसोटी सामन्यांमध्ये 32.22 च्या सरासरीने 302 विकेट्स घेतल्या आहेत. इशांतने भारतातील 39 कसोटींमध्ये 103 तर परदेशातील 60 टेस्ट मॅचमध्ये 199 विकेट्स घेतल्या आहेत. 78 धावा देत 9 विकेट्स ही इशांतची भारतातील सर्वश्रेष्ठ वैयक्तिक कामगिरी आहे. तर परदेशात इशांतने 108 धावा देत 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 3rd Test Live Updates | इंग्लंडला दुसरा धक्का, जॉनी बेयरस्टो आऊट

Motera Stadium | जगातील सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने भिडणार, वाचा का आहे खास

(india vs england 3rd test Ishant Sharma became the 11th player from Team India to play 100 Test matches)