अहमदाबाद : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. इंग्लडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने 40 धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या, राहुल चाहर आणि प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या विजयासह भारताने मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. (india vs england 4th t20 live score updates in marathi narendra modi stadium ahmedabad ind vs eng 2021 t20i cricket match news online) लाईव्ह अपडेट्स
शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाने चौथा सामना जिंकला. यासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे 20 मार्चला होणारा पाचवा आणि शेवटचा सामना हा अटीतटीचा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच फंलदाची करताना सूर्यकुमारने शानदार खेळी केली. सूर्यकुमारने 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 8 धावांची थरारक विजय मिळवला आहे. यासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी केली आहे.
4th T20I. It's all over! India won by 8 runs https://t.co/TYCBHJcJy1 #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) March 18, 2021
इंग्लंडला विजयासाठी 2 चेंडूत 9 धावांची आवश्यकता
इंग्लंडला विजयासाठी 3 चेंडूत 12 धावांची आवश्यकता आहे. जोफ्रा आर्चर जोरदार फटकेबाजी करत आहे.
हार्दिक पांड्याने इंग्लंडला सातवा धक्का दिला आहे. पांड्याने सॅम करनला बोल्ड केलं आहे. करननंतर जोफ्रा आर्चर मैदानात आला आहे.
शार्दुल ठाकूरने इंग्लंडला सहावा धक्का दिला आहे. शार्दुलने इयोन मॉर्गनला वॉशिंग्टन सुंदरच्या हाती कॅच आऊट केलं आहे. मॉर्गनने 4 धावांची खेळी केली. मॉर्गन बाद झाल्यानंतर ख्रिस जॉर्डन मैदानात आला आहे.
शार्दुल ठाकूरने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. शार्दुलने बेन स्टोक्सला सूर्यकुमारच्या हाती कॅच आऊट केलं आहे. स्टोक्सने 46 धावांची तुफानी खेळी केली. स्टोक्स बाद झाल्यानंतर सॅम करण मैदानात आला आहे.
राहुल चाहरनेने इंग्लंडला चौथा धक्का दिला आहे. राहुलने जॉनी बेयरस्टोला वॉशिंग्टन सुंदरच्या हाती कॅच आऊट केलं आहे. जॉनीने 25 धावांची खेळी केली. जॉनी बाद झाल्यानंतर इयन मॉर्गन मैदानात आला आहे.
बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो मैदानात चांगलेच सेट झाले आहेत. हे दोघेही जोरदार फटकेबाजी करत आहेत. हे दोघे भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहेत.
हार्दिक पांड्याने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. हार्दिकने जेसन रॉयला आऊट सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं आहे. जेसनने 40 धावांची खेळी केली. जेसन बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स मैदानात आला आहे.
राहुल चहरने इंग्लंडला दुसरा धक्का दिली आहे. चहरने डेव्हिड मलानला बोल्ड केलं आहे. मलानने 14 धावा केल्या. मलान आऊट झाल्यानंतर मैदानात जॉनी बेयरस्टो आला आहे.
इंग्लंडने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 48 धावा केल्या आहेत. जेसन रॉय आणि डेव्हिड मलान मैदानात खेळत आहेत.
4th T20I. 5.6: W Sundar to J Roy (33), 4 runs, 48/1 https://t.co/TYCBHJcJy1 #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) March 18, 2021
भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. भुवीने जोस बटलरला केएल राहुलच्या हाती कॅच आऊट केलं आहे.
भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीने टीम इंडियाला शानदार सुरुवात दिली आहे. भुवनेश्वरने पहिली ओव्हर मेडन टाकली आहे.
इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर सलामी जोडी मैदानात खेळत आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले आहे.
टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत अफलातून 37 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
A brilliant fifty from Suryakumar Yadav and crucial knocks from Rishabh Pant and Shreyas Iyer help India post 185/8 in the fourth T20I.
Can England chase this down?#INDvENG ➡️ https://t.co/rqFjwUKgNG pic.twitter.com/c53LcsrOiE
— ICC (@ICC) March 18, 2021
टीम इंडियाने आठवी विकेट गमावली आहे. वॉशिंग्टन सुंदर 4 धावा करुन माघारी परतला आहे.
भारताने सातवी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर 37 धावा करुन बाद झाला आहे.
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. हार्दिक पांड्या आऊट झाला आहे. पांड्याने 11 धावा केल्या.
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. रिषभ पंत 30 धावा करुन बोल्ड झाला आहे. पंतनंतर हार्दिक पांड्या मैदानात आला आहे.
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. आक्रमक फलंदाजी करत असलेला सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. सूर्याचं हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. सॅम करनच्या गोलंदाजीवर डेव्हिड मलानने कॅच घेत सूर्यकुमारला तंबूत पाठवलं. दरम्यान सूर्यकुमार हा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
भारताने तिसरी विकेट गमावली आहे. विराट कोहली आऊट झाला आहे. विराट मोठा फटका मारण्याच्या नादात स्टंपिग आऊट झाला. आदिल रशीदने टाकलेल्या गुगलीवर विराट मोठा फटका मारण्यासाठी पुढे आला. पण बॅटचा बोलशी संपर्क झाला नाही. यामुळे विराट 1 धाव करुन तंबूत परतला.
टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. केएल राहुल आऊट झाला आहे. केएलने 14 धावा केल्या. केएलनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे.
सूर्यकुमार यादवने सामन्याती 7 व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर क्लास सिक्सर खेचला. त्याने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर षटकार खेचला.
भारताने पहिल्या 6 ओव्हरमधील पावर प्लेमध्ये 1 विकेट गमावून 45 धावा केल्या. या दरम्यान रोहित शर्माची एकमेव विकेट गमावली. रोहितने 12 धावा केल्या. दरम्यान सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल खेळत आहेत.
End of powerplay! #TeamIndia move to 45/1. @surya_14kumar & @klrahul11 batting on 1⃣6⃣ & 1⃣2⃣ respectively. @Paytm #INDvENG
Follow the match ? https://t.co/TYCBHIV89r pic.twitter.com/RwPFEITDsd
— BCCI (@BCCI) March 18, 2021
सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील बॅटिंगला सिक्स खेचत सुरुवात केली आहे. सूर्यकुमारने जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवर सिक्सर खेचला.
टीम इंडियाला पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आऊट झाला आहे. जोफ्रा आर्चरने आपल्या गोलंदाजीवर रोहितला कॅट आऊट केलं. रोहितने 12 धावा केल्या.
रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहितला या सामन्याआधी 9 हजार धावांसाठी 11 धावांची आवश्यकता होती. रोहितने या 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये केल्या. रोहित टी 20 मध्ये असा किर्तीमान करणारा विराट कोहलीनंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आहे. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर रोहितने हा सिक्स मारला आहे.
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
चौथ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. यामध्ये युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चाहरला संधी देण्यात आली आहे. तर इशान किशनच्या जागी सूर्यकुमारला संधी मिळाली आहे. इशानला ग्रोईन इंज्युरीमुळे विश्रांती देण्यात आली आहे.
अशी आहे टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि राहुल चाहर.
इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात थोड्याच वेळात चौथ्या टी 20 सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. इंग्लंडने 5 सामन्यातील मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. यामुळे सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यालाठी विराटसेनेला हा सामना ‘करो या मरो’चा आहे.
It's Match Day!#TeamIndia will look to bounce back and level the series as they take on England in the 4th T20I.@Paytm #INDvENG pic.twitter.com/IwfsoPLHyh
— BCCI (@BCCI) March 18, 2021