मुंबई : इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी ट्वेन्टी सामन्यात (india Vs England 4th T20) हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधारपदाच्या भूमिकेत असताना चमकला. त्याने केवळ चार ओव्हर्ससाठी कर्णधापद स्वीकारलं. पण याच चार ओव्हर्समध्ये त्याने इंग्लंडच्या गोटात गेलेला विजय परत भारताकडे खेचून आणला. सोशल मीडियावर आता रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचं कौतुक होत आहे तसंच टी ट्वेन्टीचं कर्णधारपद रोहित शर्माकडे द्या, अशी मागणीही होत आहे. (india Vs England 4th T20 Rohit Sharma Captaincy Appriciate Social media)
रोहितच्या केवळ चार ओव्हर्सच्या कॅप्टन्सीपुढे इंग्लंडने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. 16 व्या ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन्सी करावी लागली. ज्यावेळी रोहितकडे कॅप्टन्सी आली तो काळ संघासाठी अतिशय कठीण होता. पण याच दरम्यान रोहितने ज्या प्रकारे कॅप्टन्सी केली ती क्रिकेट रसिकांना फारच आवडली.
शार्दुल ठाकूरच्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलेच रन्स काढले होते. त्याचा इकोनॉमी रेट हाय होता. परंतु अशाही परिस्थितीत रोहितने शार्दूल ठाकूरवर विश्वास दाखवला तसंच त्याचा हौसला बुलंद केला. त्याला सामन्यातली 17 वी ओव्हर टाकण्याची संधी दिली. शार्दुलने बेन स्टोक्स आणि इयोन मॉर्गन या महत्वाच्या फलंदाजांना सलग 2 चेंडूवर बाद केलं. त्यामुळे सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला. रोहितने दिलेला कानमंत्र शार्दुलने खरा ठरवला.
शार्दुलने बेन स्टोक्स आणि इयॉन मॉर्गनला सलग 2 चेंडूवर बाद केलं. त्यामुळे त्याला हॅटट्रिकची संधी होती. पण त्याला हॅटट्रिक घेता आली नाही. पण यानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली. शार्दुलने सामन्यातील शेवटची ओव्हर टाकली. यात त्याने 5 व्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनला आऊट केलं. अशाप्रकारे शार्दुलने आपल्या 4 ओव्हरमध्ये 42 धावा देत निर्णायक क्षणी 3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
Rohit Sharma is the stand-in captain as Kohli goes off the field.
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2021
Just a thought … @surya_14kumar Mumbai Indian … @hardikpandya7 Mumbai Indian … @ImRo45 captaincy Mumbai Indian !!!! @mipaltan #JustSaying #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 18, 2021
Rohit sharma after taking captaincy….. #INDvsENG_2021 #INDvENGt20 #umpire #suryakumar #RohitSharma pic.twitter.com/wxJXUd53HK
— Durgendra Singh Rathore (@Baeblu41) March 18, 2021
@virender_swag
Why Rohit Sharma is not captain of india in limited over cricket or t20 ??— Ankit Sharma (@coolboyAankit) March 18, 2021
Rohit Sharma captaincy in the last 4 overs won India the match.. #INDvsENG
— Sumit Kadel (@SumitkadeI) March 18, 2021
हे ही वाचा :
रोहित शर्माची 10 वर्षांपूर्वी सूर्यकुमारच्या बॅटिंगबद्दल भविष्यवाणी, काय होतं ‘ते’ ट्विट?