अहमदाबाद : भारताने पाहुण्या इंग्लंडवर चौथ्या टी 20 सामन्यात ((india vs england 4th t2oi) 8 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाचा रंगतदार सामन्याच विजय झाला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. सूर्यकुमार यादव ( suryakumar yadav) या सामन्याचा हिरो ठरला. त्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. मात्र थर्ड अंपायर्सने त्याला ज्या पद्धतीने बाद घोषित केलं, त्यासाठी नेटीझन्सने बीसीसीआय आणि थर्ड अंपायरला चांगलेच फैलावर घेतले आहे. सूर्यकुमारला बाद दिल्याच्या निर्णयाविरोधात अनेक ट्विट केले जात आहेत. (india vs england 4th t2oi suryakumar yadav out or not out netizens troll third umpire)
आपल्या पहिल्या सामन्यात सूर्या चांगल्या रंगात दिसत होता. त्याने षटकार खेचून आपला आक्रमक रंग दाखवून दिला. त्यानंतर सूर्याने चौफेर फटकेबाजी केली. 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.त्यानंतर सूर्यकुमार आणखी आक्रमक झाला होता.
This is How you start Your International Debut Match#suryakumar
#INDvsENG pic.twitter.com/FO9oB3QjDq— Kishan Shivrajkumar (@Kishans73645975) March 18, 2021
सॅम करण 14 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर सूर्याने 57 धावांवर असताना जोरदार फटका मारला. मात्र तो कॅच डेव्हिड मलानने पकडला. डेव्हिड मलानने टिपलेला चेंडूचा जमीनीला स्पर्श झाला की नाही, याबाबत फिल्ड अंपायर्सना शंका होती. त्यामुळे त्यांनी याबाबतचा निर्णय थर्ड अंपायर्सना घ्यायला लावला. मात्र तिसऱ्या अंपायरही अचूक निर्णय देऊ शकले नाहीत. थर्ड अंपायरने सूर्याला बाद घोषित केलं. यामुळे नेटकऱ्यांमध्ये नाराजी आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय.
You can very well see this the ball touches the ground !!
This is so unfair ??!!@bhogleharsha @cricketaakash #suryakumar #NotOut pic.twitter.com/LXmxce0BkK— Atharva .S. Uttarkar (@imAtharvaUt) March 18, 2021
नेटीझन्सनुसार सूर्यकुमारला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं म्हटलं जात आहे. अनेकांनी व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये डेव्हिड मलान कॅच घेताना त्याने चेंडू जमिनिला स्पर्श केल्याचं दिसतंय. मात्र यानंतरही तिसऱ्या पंचांनी सूर्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिलं. यामुळे या निर्णयाविरोधात नेटकरी अनेक ट्विट करत आहेत. त्यामुळे ट्विटरवर #NotOut हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
"Third Umpire"
Decision : OUT
Really third Umpire:-| ?#suryakumar #washingtonsundar#thirdumpire pic.twitter.com/3WzhfcRwIP— Ridham Golakiya (@GolakiyaRidham) March 18, 2021
I think it is enough to give not out… #INDvsENG_2021 #suryakumar pic.twitter.com/B80rCXXShj
— Khushi (@Gaganpreet504) March 18, 2021
टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
Blind Umpire ?
It's Not Out ☑️#Umpire #SuryaKumar pic.twitter.com/97QYrt5Y9B
— Sachin (@SachinSince1998) March 18, 2021
संबंधित बातम्या :
(india vs england 4th t2oi suryakumar yadav out or not out netizens troll third umpire)