मुंबई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (Team India) यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी (4th Test) सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. ही चौथी कसोटी टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship 2021) दृष्टीने महत्वाची असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. या उद्देशाने भारताच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. या सरावादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (india vs england 4th test Strong practice of Indian players)
Training ✅@Paytm #INDvENG pic.twitter.com/G7GCV1EA8U
— BCCI (@BCCI) March 1, 2021
या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू हे बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंगचा सराव करताना दिसत आहेत. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
#TeamIndia members gearing up for the fourth and final Test against England.@Paytm #INDvENG pic.twitter.com/7YmPyfUj6W
— BCCI (@BCCI) February 28, 2021
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली होती. यामुळे चौथ्या टेस्टमध्ये बुमराहच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.
या कसोटी मालिकेनंतर उभय संघात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 12 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमधील सर्व सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच करण्यात आले आहे.
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या :
(india vs england 4th test Strong practice of Indian players)