मुंबई : चेन्नईतली पहिली कसोटी गमावल्यानंतरही टीम इंडियाने कसोटी मालिकेत इंग्लंडला (India Vs England) 3-1 ने पराभूत केले. चेन्नईत खेळलेली दुसरी कसोटी भारताने जिंकली आणि त्यानंतर अहमदाबादमधील (narendra Modi Stadium) दोन्ही कसोटी सामने जिंकले. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने अवघ्या तीन दिवसांत एक डाव आणि 25 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या कसोटी मालिकेच्या विजयाची गोष्ट म्हणजे विजयाचे नायक विराट कोहली – चेतेश्वर पुजारा किंवा रहाणे नव्हते तर युवा दमदार खेळाडूंनी टीम इंडियाच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलला. (India Vs England 5 heroes of team India Series Win Ravichandran Ashwin, Axar patel, Rohit Sharma, Rishabh pant, Washington Sundar)
अश्विनने या संपूर्ण मालिकेत पाहुण्या इंग्लंडला आपल्या फिरकीवर नाचवलं. अश्विनने या एकूण 4 टेस्ट मॅचमध्ये 14. 72 सरासरीने एकूण 32 विकेट्स पटकावल्या. अश्विनने या सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत आपल्या होमपीचवर खणखणीत शतक लगावलं. अश्विनने या 4 सामन्यांच्या मालिकेत 31. 50 च्या एव्हरेजने 189 धावा केल्या.
अश्विनने या संपूर्ण मालिकेत पाहुण्या इंग्लंडला आपल्या फिरकीवर नाचवलं. अश्विनने या एकूण 4 टेस्ट मॅचमध्ये 14. 72 सरासरीने एकूण 32 विकेट्स पटकावल्या. अश्विनने या सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला. सोबतच अश्विनने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत आपल्या होमपीचवर खणखणीत शतक लगावलं. अश्विनने या 4 सामन्यांच्या मालिकेत 31. 50 च्या एव्हरेजने 189 धावा केल्या.
अक्षर पटेलने दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं.त्याने पदार्पणातील सामन्यापासून आपल्या फिरकीने पाहुण्या इंग्लंडला नाचवलं. त्याने या मालिकेतील एकूण 27 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने एकूण 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह अक्षर पदार्पणातील मालिकेत 27 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय ठरला. याआधी टीम इंडियाकडून दिलीप दोशी आणि शिवलाल यादव या दोघांनी अशी कामगिरी केली होती.
रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय टीमचा कणा असल्याचं सिद्ध झालं. इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची बॅट चमकली नाही मात्र रोहितने आपल्या बॅटचा करिश्मा दाखवला. रोहितने चार मॅचमध्ये 345 रन्स ठोकले. ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 57. 50 च्या नेट सरासरीने त्याने हे रन्स ठोकले.
टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन रिषभ पंतने बॅटिंग आणि कीपिंगमध्येही जलवा दाखवला. या सिरीजमध्ये 54 च्या सरासरीने त्याने 270 रन्स काढले तर स्टंपच्या मागेही त्याने चमक दाखवली. 13 फलंदाजांना त्याने माघारी धाडलं. पीचने करामत दाखवायला सुरुवात केल्यानंतर त्याने 8 झेल पकडले तर 5 स्टम्पिंग केल्या.
अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) चौथ्या कसोटीत आपल्या शतकापासून वंचित राहिला. सुंदरला शेपटीच्या फलंदाजांनी साथ न दिल्याने सुंदर आपल्या कसोटीतील पहिल्या शतकापासून अवघ्या 4 धावा दूर राहिला. सुंदरने नाबाद 96 धावांची खेळी केली. तत्पूर्वी त्याने सिरीजमध्ये 181 रन्स केले. सातव्या आणि आठव्या क्रमांकाला येऊन विपरीत परिस्थितीत त्याने हे रन्स केले.
(India Vs England 5 heroes of team India Series Win Ravichandran Ashwin, Axar patel, Rohit Sharma, Rishabh pant, Washington Sundar)
हे ही वाचा :
R Ashwin | फिरकीने कमाल, बॅटिंगने धमाल, अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’