India vs England 5th T20i Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, सामना कधी कुठे आणि केव्हा?

| Updated on: Mar 20, 2021 | 7:11 AM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (20 मार्च) टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (india vs england 5th t20i 2021) सामना खेळवण्यात येणार आहे.

India vs England 5th T20i Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, सामना कधी कुठे आणि केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (india vs england 5th t20i 2021) सामना खेळवण्यात येणार आहे.
Follow us on

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील 5 वा आणि शेवटचा सामना आज (20 मार्च) खेळवण्यात येणार आहे. मालिकेत आतापर्यंत 4 सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. यामुळे मालिका बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील हा पाचवा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. पण जिंकणार एकच संघ. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार, कुठे खेळवण्यात येणार हे जाणून घेऊयात. (india vs england 5th t20i 2021 ahmedabad live streaming when where to watch match from narendra modi stadium india time)

सामना किती वाजता सुरु होणार?

सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे.

मॅच कुठे खेळवण्यात येणार?

या मॅचचे आयोजन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.

मॅच कुठे पाहता येणार?

हा पाचवा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहेत. तसेच दूरदर्शनवरही लाईव्ह मॅच पाहायला मिळणार आहे. सोबतच www.tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील. तसेच हॉटस्टार आणि जियो टीव्हीवरही सामना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश असणार का?

वाढत्या कोरोना संसर्गामुळे स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना प्रवेश नसणार आहे. हा 5 वा सामना बंद दाराआड खेळवला जाणार आहे.

खेळपट्टी आणि वातावरण

खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक असेल. चौथ्या सामन्यातही खेळपट्टी बॅटिंगसाठी पोषक होती. तसेच नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. तसेच संध्याकाळी मैदानात दव पडण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

इंग्लंड टीम

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

विराटसेनेसाठी दिलासादायक बातमी, यॉर्कर किंगचं संघात पुनरागमन, इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज

Video | सूर्यकुमार यादवची अफलातून अर्धशतकी खेळी, कर्णधार विराटकडून कौतुक, म्हणाला….

(india vs england 5th t20i 2021 ahmedabad live streaming when where to watch match from narendra modi stadium india time)