PHOTO | किंग कोहलीला इंग्लंड विरुद्ध 5 मोठे विक्रम करण्याची संधी

| Updated on: Mar 23, 2021 | 9:42 AM

कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (india vs england odi series 2021) अनेक विक्रम करण्याची संधी आहे.

1 / 6
टेस्ट आणि टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत भिडण्यासाठी सज्ज आहे. आजपासून या वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला 5  विक्रम करण्याची संधी आहे.

2 / 6
युवराज सिंहने टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 4 शतक झळकावले आहेत. विराटला युवराजच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध 3 शतकं झळकावले आहेत. यामुळे विराट या मालिकेत 1 शतक लगावताच युवराज सिंहच्या विक्रमाची बरोबरी साधेल.

3 / 6
विराटला सुरेश रैनाला पछाडत इंग्लंड विरुद्ध चौथा यशस्वी फलंदाज होण्याची संधी आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध 30 सामन्यात 1 हजार 178 धावा केल्या आहेत. तसेच रैनाने इंग्लंड विरुद्ध 1 हजार 207 धावा केल्या आहेत. यामुळे विराटला  रैनाला पछाडण्यासाठी विराटला 29 धावांची गरज आहे.  विराट या मालिकेत 29 धावा करताच चौथा यशस्वी भारतीय फलंदाज ठरेल.

4 / 6
या मालिकेत शतक लगावताच विराट सर्वाधिक सेंच्युरी लगावणारा कर्णधार ठरेल. सध्या विराट आणि पॉन्टिंग  41 शतकांसह संयुक्तरित्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

5 / 6
विराटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतात 5 हजार धावा करण्याची संधी आहे. यासाठी विराटला 135 धावांची संधी आहे. विराटने ही  कामगिरी केल्यास तो सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि  राहुल द्रविड यांच्यानंतर चौथा फलंदाज ठरेल.

6 / 6
विराटला सचिनच्या  मायदेशातील सर्वाधिक वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची नामी संधी आहे. सचिनच्या नावे भारतात एकूण 20 एकदिवसीय शतकांची नोंद आहे. तर विराटने आतापर्यंत भारतात 19 वनडे सेंच्युरी लगावल्या आहेत.